Sindhudurg News : उद्धव ठाकरे यांनी कोकण दौऱ्यात दीपक केसरकर यांच्यावरही बोचरी टीका केली होती. या टीकेला आता दीपक केसरकर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. गद्दार आणि खोके असली टीका आता आम्ही पुन्हा सहन करणार नाही, असं सांगत शिवसेना नेते मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती एक खळबळजनक आरोप केला आहे.
'उद्धव ठाकरे यांनी मंत्रिपद देण्यासाठी कोट्यवधी रुपयांची माझ्याकडे मागणी केली होती. परंतु मी "कमिटमेंट" पूर्ण करण्यासाठी कमी पडलो. त्यामुळे मला डावलण्यात आलं तरीही तब्बल एक कोटी रुपये मी त्यांना चेकच्या माध्यमातून दिले, तशा प्रकारचे माझ्याकडे पुरावे आहेत,' असा आरोप बुधवारी पत्रकार परिषदेत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, 'तब्बल दोन महिने मी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर वाट बघत होतो. परंतु मला भेट देण्यात आली नाही. कॅबिनेट मंत्री पदासाठी माझे नाव चर्चेत असताना मला राज्यमंत्रिपद देण्यात आले. तरी मी गप्प राहिलो. मग मी गद्दार कसा? मला गद्दार म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?' असा सवाल केसरकर यांनी केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे दोन दिवसांपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सावंतवाडीतील जनसंवाद यात्रेतून मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला मंत्री केसरकर यांनी सावंतवाडीत येऊन प्रत्युत्तर दिले. माझ्या श्रध्देवर संशय घेणाऱ्या उध्दव ठाकरे यांनी मी शिर्डीहून आणलेली साईबाबांची शाल ठाकरे यांना घातल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. याची कबुली रश्मी ठाकरे यांनी दिली आहे. मग आता सावंतवाडीत येऊन खोटे कशाला बोलायचे? असा सवाल मंत्री केसरकर यांनी केला आहे.
मला गद्दार म्हणण्याचा अधिकार ठाकरे यांना नाही. त्याचे कर्तृत्व काय? मुख्यमंत्री असताना लोकांना सोडा आमदारांनाही भेटत नव्हते. मी तब्बल दोन महिने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाच्या बाहेर वाट बघत होतो. पण मला कधी भेट मिळत नव्हती. मग यांच्याकडे लोक थांबणार कसे? असा सवाल करत मी स्वतःहून शिवसेनेत गेलो नव्हतो. मला भाजपकडून निमंत्रण असतांना उद्धव ठाकरे यांनी सतत निमंत्रण दिले म्हणून शिवसेनेत गेलो, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले.
दीपक केसरकर यांनी केलेल्या विधानचं मी समर्थन करतो. उद्धव ठाकरे पदांसाठी पैसे घेतात. असा आरोप 2004 साली नारायण राणेंनी रंगशारदा येथे पहिल्यांदा केला होता. रंगशारदामध्ये शिवसेनेची त्यावेळी बैठक झाली होती. विधानसभा, लोकसभा, जिल्हाध्यक्ष पदासाठी उद्धव ठाकरे कसे पैसे घेतात त्याचं रेटकार्ड जाहीर करून टाकलं होतं. त्याचप्रमाणे केसरकरदेखील म्हणत आहेत की, मी चेक दिला होता आणि अकाउंटमध्ये चेक क्लिअर झाला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे विधानसभा, लोकसभेसाठी पैसे घेतात यावर शिक्कामोर्तब झालेला आहे.
तर वैभव नाईक म्हणाले, राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर दिपक केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेत त्यांना निवडून आणून विधानसभेवर पाठविण्यात आले. राष्ट्रवादीचे उमेदवार असतील तर त्यांना आम्ही निवडून देणार नाही, त्यामुळे केसरकर यांनी शिवसनेत प्रवेश केला. नारायण राणे यांनी दीपक केसरकर यांना जिल्हा नियोजनमधून बाहेर ठेवलं होतं. त्यामुळे शिवसेनेतुन केसरकरांना निवडून आणण्याचं निश्चित केलं होतं आणि त्यावेळी केसरकरांना कुठलातरी आधार पाहिजे होता. म्हणून त्यावेळी शिवसेनेने आधार दिला. त्यामुळेच दीपक केसरकर हे आमदार, मंत्री होऊ शकले.
याशिवाय मंत्री असताना केसरकरांनी किती जणांना खोके दिले. निवडणुकीच्या वेळी माझ्याकडे पैसे नाही मी जमीन विकतोय असं टाहो फोडून सांगतायत. नारायण राणे, शरद पवार अशा नेत्यांवर टीका करायची आणि संधी साधून घ्यायचे. दीपक केसरकर यांच्या सोबत सावंतवाडी मतदारसंघातील जनता नाही. त्यामुळे केसरकर यांची पायाखालीची वाळू सरकली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.