Ratnagiri : उद्धव ठाकरे यांनी आपल्या कोकण दौऱ्यात एकनाथ शिंदे गटातील मंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला. रत्नागिरीतील सभेत उदय सामंत यांना लाचार म्हणून हिणवले. मंत्रिपदासाठी तु्म्ही लाचार होऊन आमच्याकडे आला होता. अशी जहरी टीका ठाकरेंनी उदय सामंत यांच्यावर केली होती. या टीकेला चोख प्रत्युत्तर उदय सामंत यांनी दिले असून त्यांना मंत्रिपद कसे मिळाले याची पोलखोल केली आहे. (Uday Samant On Uddhav Thackeray)
'मी शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी त्यावेळी मिलिंद नार्वेकर यांनी मध्यस्थी केली म्हणून मी गेलो. 2014 मध्ये मला म्हाडाचे अध्यक्ष पद दिले, हे सांगण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला. त्यावेळी मी आणि चंद्रकांत पाटील लांजा येथे होतो. म्हणजेच मला म्हाडा अध्यक्ष कोणी केलं हे देखील स्पष्ट आहे. माझ्या मंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी शिफारस केली. यात उद्धव ठाकरेंचे योगदान काय, असा अप्रत्यक्ष सवालच उदय सामंत यांनी उपस्थित केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लाचारी आम्ही केली नाही तर बाळासाहेबांनी सांगून सुद्धा काँग्रेसबरोबर जाणं ही लाचारी आहे, असा टोल सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. माझ्या मंत्रिपदासाठी मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केला. त्याच्यामुळे मला मंत्री होता आले. त्यावेळी देखील माझं मंत्रिपदाच्या यादीत नाव न टाकण्याचा कार्यक्रम नाशिकमध्ये चालू होता, असाही आरोप उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
उद्धव ठाकरे काँग्रेसच्या कुबड्या घेऊन उभे राहिले आहेत. त्यांनी पक्ष म्हणून स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकले पाहिजे. बाळासाहेबांचा विचार हा काँग्रेस बरोबर जाऊ नये असा होता. शिवसेना-भाजपची एकत्र लढले मात्र हे नंतर काँग्रेसबरोबर गेले. त्यामुळे गद्दारांना धडा शिकवा, असे उद्धव ठाकरे म्हणत आहेत त्यातून कोकणातील जनतेने बोध घेतला की मतदारांशी गद्दारी करून काँग्रेस बरोबर गेलेल्यांच्या पेकाटात मतदार लाथ घातल्याशिवाय गप्प बसायचे नाही, असा दावा सामंत यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यात सोबत असलेले काही लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारणार आहेत. लवकरच ते आमच्याकडे येतील, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला. ठाकरे यांनी माझ्या व्यवसायावर टीका केली. पण व्यवसाय न करता सहा सहा मजली घर कसे बांधले, असा सवाल देखील सामंत यांनी ठाकरेंना केला.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.