Nilesh Rane News : राणेसाहेबांवर एक शब्द जरी काढला तर..; निलेश राणेंचा भास्कर जाधवांना इशारा...

Reply to criticism of Uddhav Thackeray, Bhaskar Jadhav : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात सिंधुदुर्गसाठी काय केलं, ते सांगतील असे अपेक्षित होतं.
Bhaskar Jadhav, Nilesh Rane
Bhaskar Jadhav, Nilesh RaneSarkarnama
Published on
Updated on

Kokan Political News : उद्धव ठाकरेंच्या दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यात त्यांनी तसेच त्यांच्या गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आता भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात सिंधुदुर्गसाठी काय केलं, ते सांगतील असे अपेक्षित होतं. (Nilesh Rane News Reply to criticism of Uddhav Thackeray, Bhaskar Jadhav)

पण केवळ राणे यांच्यावर टीका करण्यासाठी त्यांनी ती सभा चालवली. हा वाळूचोर भास्कर जाधव हातपाटीच्या वाळूवर आपले घर चालवतो, असाही घाणाघाती आरोप एकेरी भाषेत निलेश राणे यांनी केला आहे. भास्कर जाधव मी तुझ्या मतदारसंघात गुहागर येथे 16 फेब्रुवारीला सभा घ्यायला येतो आहे. त्यावेळेला सगळच बोलणार आहे, असा इशारा राणे यांनी दिला आहे.

Bhaskar Jadhav, Nilesh Rane
Sangli Politics : जयंतराव-विश्वजित कदमांना अजितदादा देणार धक्का; जयश्रीताईंचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित

या जन्मात तुझा हा हिशोब चुकता करणार हा निलेश राणे, असेही ते म्हणाले. त्यामुळे आता ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर कोकणात राजकारण तापले आहे. राणेसाहेबांवर एक शब्द जरी काढला तर... मग माझ्या आयुष्याचं काय व्हायचं ते वाटोळे होऊन जाऊ दे. मी काय आयुष्यभर राजकारणामध्ये निवडणुका लढवायला आलेलो नाही. नसेल नशिबात नाही लढवणार निवडणूक.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकांनी नाही स्वीकारलं परत एकदा पडेल. पण मी जाधव याच्यासारख्याच ऐकून घेणार नाही, असा इशारा निलेश राणे यांनी थेट पत्रकार परिषदेत दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भास्कर जाधव, तू दुसऱ्यांचे बाप काढतोस पण तू जेवढी भाषा घसरवशील त्याच्याहून पलीकडे जाऊन निलेश राणे तुला उत्तर देणार तेवढे लक्षात ठेव, असे राणेंनी म्हटले आहे.

आमच्या पक्षाचे 15 फेब्रुवारीपर्यंत अभियान चालू आहे. मी 16 तारखेला गुहागरात जाणार. माझी तेथे 16 तारखेला जाहीर सभा आहे. त्या वेळेला मी सगळेच बोलणार आहे. जी काही उरलीसुरली अब्रू आहे ती तुझ्या मतदारसंघात येऊन काढणार, असा इशारा त्यांनी दिला आहे. ठाकरे कुटुंबावर मी गेल्या 15 वर्षात काही बोललो असेल तर संन्यास घेईन, असं म्हणणारे भास्कर जाधव यांची व्हिडिओ क्लिप निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दाखवली.

आता संन्यास घेशील का ? असा थेट एकेरी भाषेतच सवाल त्यांनी केला. मी आजपर्यंत पातळी कधीही सोडली नव्हती. एका मर्यादेमध्ये राहून आपण टीका करतो. याच जाधवला पवार साहेबांनी महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष केला निवडणुकीच्या तोंडावर याला हाकलला. सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून आणला. पवार साहेबांनाही तुझी लायकी कळली होती, अशा शब्दात राणेंनी प्रहार केला आहे.

Bhaskar Jadhav, Nilesh Rane
Abdul Sattar : कृषीमंत्री पद गेल्यानंतरही अब्दुल सत्तार पुन्हा जर्मनी दौऱ्यावर; आताचं कारण काय ?

पवार साहेबांनी ओळखलं होतं की याला जर ठेवला तर आपली हातातून निवडणूक जाते. म्हणून निवडणुकीच्या तोंडावरच भास्कर जाधवला बाजूला केला. काही वर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले. पण त्या अडीच वर्षात याला मंत्री केला नाही. कारण त्यांनाही याची लायकी माहिती आहे, की हा मंत्री बनवण्याच्या लायकीचा नाही असा आरोप राणे यांनी केला आहे.

एक माजी मुख्यमंत्री राणे यांच्या कुटुंबावर, आमच्या नेत्यावर तू बोलतोस मग आम्ही आमची मर्यादा सोडून तुमच्या नेत्यांवरती बोललो तर.. असाही सवाल राणे यांनी उपस्थित केला. तुला काय करायचं असेल ते कर माझ्या विरोधात कितीही तक्रारी कर पण मी आता सोडणार नाही अशा संतप्त शब्दात राणे यांनी इशारा दिला आहे.

मला भाषा बिघडवायची नव्हती. मलाही माझ्या मर्यादा कळतात. कोणाबद्दल किती बोलायचं त्याला मर्यादा आहेत. पण मला आज भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेमुळे बोलावं लागत आहे. मी कधीही पातळी सोडून आजवर बोललो नव्हतो, पण आज सविस्तर बोलणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासारखे कपटी माणूस अवघ्या महाराष्ट्रात नाही. ठाकरे घराण्यातला ऐश्वर्य ठाकरे हे मुलाचं नाव आहे त्याचा डीएनए तपासा, असेही थेट आव्हान राणे यांनी दिले आहे.

(Edited by Amol Sutar)

Bhaskar Jadhav, Nilesh Rane
Lok Sabha Election 2024 : केसीआर यांना तीन दिवसांत दुसरा मोठा दणका; खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com