जिल्हा बँकेतील सत्तांतराला कारणीभूत ठरलेला गायब मतदार अखेर सापडला...

सतीश सावंत यांचा पराभव झाला आहे. वायंगणकर परत आलेत मग आता नितेश राणे यांनी समोर यायला हवे.
Sindhudurg District Bank

Sindhudurg District Bank

sarkarnama
Published on
Updated on

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बॅंक निवडणुकीसाठी (Sindhudurg District Bank Election) कणकवली तालुक्यातील विकास सोसायटी मतदार संघातील मतदार असलेले प्रमोद महिपत वायंगणकर यांना 19 डिसेंबरला अज्ञातांनी पळवून नेल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यानंतर आज (ता. ३) ते घरी परतले आहेत. त्यावर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर निशाणा साधला.

<div class="paragraphs"><p>Sindhudurg District Bank</p></div>
सावंतांचा भाजप प्रवेश ठरणार `एकला चलो रे`, जिल्ह्यातून कोणाचीच साथ नाही..

वैभव नाईक म्हणाले, वायंगणकर घरी आले याबद्दल परमेश्वराचे आभार मानतो. वायंगणकर नसल्याने आमचा पराभव झाला. ते कुणामुळे बेपत्ता झाले होते हे त्यांनी आधीच सांगितले आहे. त्यांच्या बेपत्ता होण्यामागे कोण होते हे सर्वांना माहीत आहे. ते बेपत्ता झाल्याने आमच्या हातून जिल्हाबँक गेली, असा आरोप नाईक यांनी केला.

वायंगणकर बेपत्ता होऊन घरी आले. त्यामुळे नितेश राणे यांनी आता तरी समोर यायला हवे, असेही वैभव नाईक म्हणाले. सतीश सावंत यांचा पराभव झाला आहे. वायंगणकर परत आलेत मग आता नितेश राणे यांनी समोर यायला हवे. नितेश राणे यांनी पोलिसांच्या कारवाईला समोरे जायला हवे, अस आवाहन नाईक यांनी केले.

<div class="paragraphs"><p>Sindhudurg District Bank</p></div>
भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या तेलींना फडणवीसांनी दिला 'हा' कानमंत्र

या वेळी त्यांना राजन तेली यांनी दिलेल्या राजीनाम्या बद्दल विचारेल असता ते म्हणाले, राजन तेली हे पुन्हा राजकारणात येतील. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. कोणावर जबाबदारी द्यायची हे पक्ष नेतृत्व ठरवेल. सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही राणे यांनी ईश्वर चिठ्ठीतून जिंकली आहे, असा टोला नाईक यांनी लगावला. बँक त्यांच्या हातात होती. मात्र, आम्ही चांगल्या जागा मिळवल्या. निवडणुकीत पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. येणाऱ्या काळात आम्ही निवडणूक जिंकू, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com