Old Pension Scheme : विजय होताच जुन्या पेन्शन योजनेबाबत ज्ञानेश्वर म्हात्रेंचे मोठे विधान; म्हणाले...

Dnyaneshwar Mhatre wins in Konkan : विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदार संघात भाजपचे (BJP) ज्ञानेश्वर म्हात्रे दणदणीत विजयी झाले आहेत.
Dnyaneshwar Mhatre
Dnyaneshwar MhatreSarkarnama
Published on
Updated on

Konkan Teacher Election News : विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदार संघात भाजपचे (BJP) ज्ञानेश्वर म्हात्रे दणदणीत विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील (Balaram Patil) यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

विजय झाल्यानंतर ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले की, हा विजय संपूर्ण शिक्षकांचा आहे. गेल्या सहा वर्षांत काम केले त्याचा हा विजय आहे. तब्बल 33 संघटनांचा मला पाठिंबा मिळाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री रवींद्र चव्हाण, उदय सामंत, दीपक केसरकर यांनी मेहनत घेतली. या सर्वांचा विश्वास सार्थ ठरल्याचेही म्हात्रे यांनी सांगितले. तसेच आपल्या कार्यकाळात शिक्षकांच्या पेन्शनचा प्रश्न सोडवणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली.

Dnyaneshwar Mhatre
Konkan Teacher Constituency Election : भाजपने कोकणात केला आघाडीचा करेक्ट कार्यक्रम; म्हात्रेंच्या विजयाची पाच कारणे

म्हात्रे म्हणाले की, वीस हजारांच्या पुढे मला मते पडली. मागील सहा वर्षात शिक्षकांची कामे झाले नव्हती, असा आरोप होता. साडेआठ हजार शिक्षकांची काम मी स्वतः केली. आताही शिक्षकांसाठी चांगले काम करणार आहे. शिक्षकांच्या पेन्शनचा प्रशन सोडवणार, असल्याचा निर्धार यावेळी म्हात्रे यांनी व्यक्त केला.

Dnyaneshwar Mhatre
Marathwada Teacher Constituency Result : विक्रम काळे पहिल्या पंसतीत आघाडीवर, दुसऱ्या क्रमांकावर किरण पाटील...

दरम्यान, कोकणात पदवीधर मतदारसंघात एकूण ९१.०२ टक्के मतदान झाले होते. यात आता कोकणात भाजप चे ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांना २० हजार ८०० मते मिळाली आहेत. तर बाळाराम पाटील यांना अवघ्या ९ हजार ५०० मतांवर समाधान मानावे लागले. याठिकाणी गेल्या वेळेपेक्षा अधिक मतदान झाले होते. त्याचा फायदा म्हात्रे यांना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com