ED Raid : ईडी अ‍ॅक्शन मोडमध्ये! रत्नागिरीत छापेमारी, संशयिताचे आमदाराशी संबंध; कोकणात खळबळ

ED Action Maharashtra : इसिस’च्या माध्यमातून राज्यात दहशतवादी कारवाया करणाऱ्या साकिब नाचण आणि पुण्यातील प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने तपास सुरू केला होता.
Ed Raid
ED raids Sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. आयएसआयएस दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक मदत प्रकरणी ईडीने देशभर मोठी छापेमारी केली.

  2. महाराष्ट्रासह दिल्ली, कोलकाता आणि उत्तर प्रदेशातील 40 ठिकाणी कारवाई करण्यात आली.

  3. रत्नागिरीत ईडीची छापेमारी झाल्याने स्थानिक पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे.

Mumbai/Ratnairi News : दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक मदत प्रकरणी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया मॉड्यूल आणि पुण्यातील प्रकरणाविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी मोठी कारवाई केली आहे. राज्यासह दिल्ली, कोलकाता आणि उत्तर प्रदेशामधील एकूण 40 हून अधिक ठिकाणी ईडीने छापेमारी केली. यात राज्यातील पडघा–बोरिवली परिसरासह दमन आणि रत्नागिरीचा समावेश आहे. दरम्यान रत्नागिरीत छापेमारी झाल्याने येथे एकच खळबळ उडाली आहे.

ईडीने दहशतवादी निधीच्या संशयावरून ठाणे जिल्ह्यातील पडघा, भिवंडीजवळील बोरिवली, दमन, पुणे, मालेगाव तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एका उद्योजकाच्या कात कारखान्यावर धाड टाकली. गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील त्या उद्योजकाच्या घरी ईडीचे अधिकारी ठांड मांडून बसले असून ते तपास करत आहेत. तर खैर वृक्षाच्या तस्करीतून मिळणारा पैसा दहशतवादी कृत्यांसाठी वापरला जात असल्याचा संशय ईडीने व्यक्त करत आयकर विभागासह महाराष्ट्र एटीएसच्या सहकार्याने छापेमारी केलीय.

यावेळी ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भिवंडी परिसरातील पडघा येथे गुरुवारी पहाटेपासून तपास केला जात असून एनआयए आणि एटीएसशी संबंधित एका प्रकरणाच्या संदर्भात राज्यात 40 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. ही कारवाई पडघा येथील बोरिवली गावात पूर्वी केलेल्या कारवाईवरून करण्यात आली असून संशयितांच्या घरांची झडती घेतली जात आहे. ईडी संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी करत असून राष्ट्रीय तपास यंत्रणा देखील तपास कार्यात मदत करत आहे.

Ed Raid
Baramati ED Raid : बारामतीत ईडीची छापेमारी, मंत्रालयातील मोठ्या अधिकाऱ्यांची फसवणूक? आनंत लोखंडे विरोधात फास आवळला

दरम्यान ED ने केलेल्या पडघा–बोरिवली परिसरासह दिल्ली, कोलकाता, हजारीबाग, प्रयागराज, दमन आणि रत्नागिरीत येथील छापेमारीत सुमारे साडेनऊ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. याशिवाय आरोपी व संशयितांची 25 बँक खाती गोठविण्यात आली असून विविध आक्षेपार्ह कागदपत्रे, डिजिटल उपकरणे इत्यादी जप्त करण्यात आली आहेत. तसेच आरोपी व इतर संशयित व्यक्तींच्या स्थावर मालमत्तांशी संबंधित कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.

दरम्यान चिपळूण तालुक्यातील उद्योजकावर देखील कारवाई करण्यात आली असून त्याच्या कात कारखान्यावर धाड टाकली गेली आहे. सध्या येथे तपास यंत्रणा तपास करत आहेत. याआधी या उद्योजकाची चेक ने केलेल्या व्यवहारमुळे एटीएसने चौकशी केली होती. यानंतर आता पुन्हा एकदा त्याच्यावर छापेमारी झाली असून यावेळी ईडीचे अधिकारी त्याच्या घरापर्यंत पोहचले आहेत.

उद्योजक आमदाराच्या जवळचा

चिपळूण तालुक्यातील हा उद्योजक एका पक्षाचा स्थानिक नेता असून तो एका आमदाराच्या जवळचा असल्याची चर्चा आहे. या कारवाईदरम्यान हा उद्योजक नागपूर येथे अधिवेशनाला गेल्याचीही चर्चा असून अचानक ईडीने छापेमारी केल्याने त्याची आई व पत्नी घाबरल्याचेही येथे बोलले जात आहे. तर ईडीचे अधिकाऱ्यांनी कुटुंबाकडे नोटीस देत त्या उद्योजकाला मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात बोलविण्यात आल्याची माहितीही आता समोर येत आहे.

Ed Raid
ED Raid Video : छापेमारीनंतर आमदाराची पहिल्या मजल्यावरून उडी; ED च्या अधिकाऱ्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करत शेतात पकडले...

FAQs :

1. ईडीने ही छापेमारी का केली?
आयएसआयएस दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक मदत दिल्याच्या संशयावरून.

2. कोणकोणत्या ठिकाणी छापेमारी झाली?
महाराष्ट्र, दिल्ली, कोलकाता आणि उत्तर प्रदेशातील 40 हून अधिक ठिकाणी.

3. महाराष्ट्रातील कोणत्या भागात छापे पडले?
पडघा–बोरिवली परिसर, दमन आणि रत्नागिरी येथे.

4. ही कारवाई कोणत्या प्रकरणाशी संबंधित आहे?
पुण्यातील आयएसआयएस मॉड्यूल आणि दहशतवादी फंडिंग प्रकरणाशी.

5. रत्नागिरीत खळबळ का उडाली?
जिल्ह्यात ईडीची छापेमारी झाल्याने नागरिक आणि प्रशासनात एकच चर्चा सुरू झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com