राणेंची प्रतिष्ठा पुन्हा पणाला; नगराध्यपदासाठी समर्थकाचा भाजप उमेदवारापुढे शड्डू!

दोडामार्ग नगराध्यक्षपदासाठी राणे समर्थक आणि भाजप उमेदवारामध्ये लढत होणार
Narayan Rane-BJP
Narayan Rane-BJPSarkarnama
Published on
Updated on

दोडामार्ग : कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीत नवा ट्विस्ट आला आहे. नगरपंचायत सभागृहात सोमवारी (ता. १४ फेब्रुवारी) भाजप विरुद्ध भाजप (bjp) असे चित्र दिसणार आहे. चेतन चव्हाण आणि राजेश प्रसादी यांच्यापैकी कुणीही नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेला अर्ज आज मागे न घेतल्याने सोमवारी नवे राजकीय नाट्य पाहायला मिळणार आहे. कसई दोडामार्ग नगराध्यक्ष निवडीची ही तिसरी टर्म आहे. मागच्या दोन्ही वेळेला संबंधित पक्षांकडे नगरसेवकांचे बहुमत असूनही अख्ख्या जिल्ह्याने कसई दोडामार्गमध्ये अनपेक्षित निवडी अनुभवल्या आहेत. त्याची पुनरावृत्ती याही वेळेला होण्याची शक्यता आहे. (fight between Rane supporters and BJP candidates for post of Dodamarg council chairman)

कसई दोडामार्ग नगरपंचायतीमध्ये भाजपचे संख्याबळ १४ आहे. उर्वरित तिघांमध्ये दोन नगरसेवक शिवसेनेचे , तर एक नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. भाजपकडे सर्वाधिक नगरसेवक असले तरी बहुमत कोणाकडे जातंय आणि वेळ पडल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाला पाठिंबा देतात, यावर नगराध्यक्ष निवड अवलंबून असणार आहे.

Narayan Rane-BJP
एकाच घरात राष्ट्रपती अन्‌ पंतप्रधान; पण त्यासाठी उद्धव ठाकरेंना साकडे!

अर्थात आजपासून प्रत्यक्ष निवडीच्या वेळेपर्यंत दोडामार्गच्या राजकीय क्षेत्रात बऱ्याच घडामोडी घडतील, हे निश्चित आहे. आजच्या घडीला चेतन चव्हाण प्लसमध्ये असल्याचे चित्र असले तरी अखेरच्या क्षणी जो बाजी मारेल तोच सिकंदर ठरणार आहे. त्या सिकंदरच्या मागे किती अदृश्य हात सक्रिय राहतील, त्यावर नगराध्यक्ष कोण होणार, हे ठरणार आहे.

Narayan Rane-BJP
सूर्यकांत दळवींना यापुढेही आनंदीत ठेवण्याचा प्रयत्न करू : परबांनी रामदास कदमांना पुन्हा डिवचले!

चेतन चव्हाण हे भाजयुमाेचे जिल्‍हा उपाध्यक्ष आहेत. तसेच, माजी उपनगराध्यक्ष, तत्कालीन गटनेते हाेते, तर राजेश प्रसादी हे माजी सरपंच व माजी स्वीकृत नगरसेवक होते. मागीलवेळेला ते पराभूत झाले असले तरी या वेळेला त्यांनी सर्वाधिक मते घेवून विजयश्री खेचून आणली आहे. त्यावेळेला त्यांचा पराभव करुन नगराध्यक्ष पदापर्यंत पोचलेले संतोष नानचे या वेळेला त्यांच्या बाजूने आहेत.

Narayan Rane-BJP
पुणे झेडपीने निलंबित केलेले वाबळेवाडी शाळेचे वारे गुरुजी बनले मंत्र्यांचे ओएसडी!

चेतन चव्हाण हे मूळ भाजपचे असून प्रसादी हे राणे समर्थक आहेत. दोघेही भाजपचेच असले तरी नगराध्यक्ष निवडणुकीचा सामना मात्र भाजप विरुध्द भाजप असाच असणार आहे. त्यात कोण जिंकतो, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com