Raigad News : रायगड लोकसभेमधून मी खासदार होईनच पण मावळ लोकसभेमधूनही आपला खासदार निवडून आल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द मी आपल्या सगळ्यांच्या विश्वासावर उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा या व्यासपीठावरून देतो अशी गर्जना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते केली आहे. या दोन्ही मतदारसंघातले सात विधानसभा मतदारसंघाचे आमदारही इंडिया आघाडीचे झाल्याशिवाय राहणार नाही असाही विश्वास गीते आणि व्यक्त केला.
माजी खासदार आणि ठाकरे गटाचे नेते अनंत गीते (Anant Gite) हे रायगड पेण येथील सभेत बोलत होते. त्यांनी यावेळी लोकसभेबाबत मोठे दावे केले. ते म्हणाले,आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचे सरकार केंद्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आणि पुन्हा एकदा या शिवसेनेला इंडिया आघाडीच्या सरकारमध्ये मानाचे पान मिळाल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी हा सुरू केलेला जनसंवाद यात्रेचा कार्यक्रम अवघ्या महाराष्ट्रभर सुरू राहणार आहे. त्याची सुरुवात शिवछत्रपतींनी ज्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या रायगडपासून करण्यात आली आहे अशी माहिती गीते यांनी दिली.
रायगड लोकसभा व मावळ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आपण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (UddhaV Thackeray) यांच्याकडून मागून घेतली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातले चार विधानसभा मतदारसंघ व मावळ लोकसभा मतदारसंघातले तीन विधानसभा मतदारसंघ अशी सात विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आपण सगळ्यांच्या वतीने स्वीकारल्याची माहिती गीते यांनी यावेळी दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आता शिवसेनेचा (Shivsena) जनसंवाद यात्रेचा मेळावा असला तरीही या व्यासपीठावरती शेकापचे व काँग्रेसचे पदाधिकारीही विश्वासाने आले आहेत. कारण त्यांना व आपल्याला सुद्धा माहिती आहे की, पुढचे मुख्यमंत्री हे उद्धव बाळासाहेब ठाकरे होणार आहेत.
हाच विश्वास देऊन आपण आता जोपर्यंत लोकसभा, विधानसभेवरती भगवा फडकत नाही, तोपर्यंत आपण आणि रायगड स्वस्थ बसणार नाही असा विश्वास उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अनंत गीते यांनी व्यक्त केला.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.