Raju Shetti News: 'बारसू'वरून राजकारण तापलं; राजू शेट्टींना रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यास बंदी!

Barsu Refinery News: "...तरीही आपण बारसूला जाणारच", अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली.
Raju Shetti
Raju Shetti Sarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला आहे. त्याला समर्थन देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी हे रत्नागिरीला येणार आहेत.

त्याआधीच राजू शेट्टी यांना आजपासून रत्नागिरी जिल्हाबंदी करण्यात आली आहे. मात्र, तरीही आपण बारसूला जाणारच, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

Raju Shetti
Farmers' Agitation : सिबील नावाचे भूत मानगुटीवर, शेतकरी धडकले एसडीओ कार्यालयावर !

राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हाबंदी करण्यात आली आहे. याबाबतची नोटीश रत्नागिरी पोलिसांनी रात्री उशिरा राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन बजावली. 31 मे अखेर राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हा बंदीची नोटीस जारी करण्यात आली आहे.

पण तरीही आपण बारसूला जाणारच, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. याबरोबरच बारसू प्रकल्पाबाबत कोणतेही वक्तव्य अथवा सोशल मीडियामध्ये पोस्ट, चित्र अथवा व्हिडीओ प्रदर्शित करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

Raju Shetti
Uddhav Thackeray : एकीच्या आणाभाका घेणाऱ्या नेत्यांमध्येच पोडियमवरून मतभेद; वज्रमूठ सभेतील प्रकाराची कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज

बारसू प्रकल्पास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. तरीही शासनाकडून त्याठिकाणी जमीनी संपादित करण्याबाबत व सदर प्रकल्पाच्या जमीन गुणवत्तेबाबतच्या विविध चाचण्या घेण्यात येत आहेत. तर याविरोधात शेतकऱ्यांनी विरोध केला असता शेतकऱ्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता.

या संघर्षामध्ये आता राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने उडी घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवरच राजू शेट्टी यांनी बारसूला जाण्याची घोषणा केली होती. संतप्त झालेल्या राजू शेट्टी यांनी अशा नोटीशींना मी भीक घालत नसून ज्या ठिकाणी शेतकरी संकटात सापडेल त्याठिकाणी मी त्यांच्यासोबत ठामपणे उभा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com