Uddhav Thackeray : एकीच्या आणाभाका घेणाऱ्या नेत्यांमध्येच पोडियमवरून मतभेद; वज्रमूठ सभेतील प्रकाराची कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज

Mumbai : भाई जगताप, नाना पटोले यांनी साध्या पोडियम वरून भाषणं केली; मात्र, अशोक चव्हाण, अजित पवार, उद्धव ठाकरे यांच्यासाठी फुलांनी सजवलेला पोडियम...
Uddhav Thackeray Speech:
Uddhav Thackeray Speech: Sarkarnama

Mumbai : मुंबईतील बीकेसी मैदानात आज (1 मे) महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. या सभेला मोठी गर्दी जमलेली होती. मात्र, याच वज्रमूठ सभेत 'मआवि'च्या नेत्यामंध्ये काही मतभेद झाल्याची चर्चा सभेनंतर राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

वज्रमूठ सभेच्या व्यासपीठावरील वेगवेगळा पोडियम ठेवण्यात आल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यावर आक्षेप घेतला. मात्र, त्यानंतर आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांनी अजितदादांची समजूत घातल्याची चर्चा आहे.

Uddhav Thackeray Speech:
Jitendra Awhad: 'अरे पचास खोका तुमने खाया...'; जितेंद्र आव्हाडांनी ऐकवलं 'रॅप साँग'

नेमकं काय घडलं?

महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत आधी साधा पोडियम पाहायला मिळाला. या साध्या पोडियमवरून आदित्य ठाकरे, संजय राऊत, भाई जगताप, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाषणं केली.

पण त्यानंतर फुलांनी सजवलेला एक वेगळा पोडियम व्यासपीठाच्या मध्यभागी ठेवण्यात आला. यावेळी त्यावर अजित पवार यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांनी त्यांची समजूत घातली. सभेच्या व्यासपीठावरच जवळपास पाच ते दहा मिनिटे पोडियमवरून कुजबूज सुरू होती.

Uddhav Thackeray Speech:
Uddhav Thackeray : ठाकरेंच्या भाषणाची सुरवातच हिंदू बंधु-भगिनी आणि मातांनो; काँग्रेस-राष्ट्रवादीला हे चालणार का?

आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांनी अजित पवारांची समजूत घातल्यानंतर ते वेगळ्या पोडियमसाठी तयार झाले. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या पोडियमवरून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाषणं झाली. मात्र, शेवटच्या तीन भाषणालाच फक्त फुलांनी सजवलेला पोडियम का? असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.

Uddhav Thackeray Speech:
Uddhav Thackeray : ...तर महाराष्ट्रातील जनताच अमित शाहांना जमीन दाखवेल; उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

दरम्यान, याआधी छत्रपती संभाजीनगरच्या सभेत उद्धव ठाकरे यांच्यासाठी वेगळी खुर्ची ठेवण्यात आली होती. त्यामुळे फक्त उद्धव ठाकरे यांच्यासाठीच वेगळी खुर्ची का? अशी चर्चा झाली होती. त्यानंतर काही नेत्यांनी यावर स्पष्टीकरणही दिलं होतं.

आता मुंबईतील बीकेसी मैदानात झालेल्या सभेत दोन वेगवेगळ्या पोडियमवरून कुजबूज झाल्याची चर्चा आहे. तसेच यावर अजित पवारांनी आक्षेप घेतल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा एकदा मतभेद झालेत का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com