Gas Cylinder crisis : रत्नागिरीत गॅस वितरकांचा मनमानी कारभार : 2 सिलिंडरमधील अंतर तब्बल 40 ते 45 दिवसांवर, प्रशासनाचे कानावर हात

ratnagiri gas cylinder crisis : मध्य पूर्वेतील देशात उडालेल्या युद्धाच्या भडक्याने गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. परिणामी व्यावसायिक क्षेत्राला कुठे गॅस पुरवठा कमी करावा लागत आहे. तर कुठे पूर्ण थांबवण्यात आला आहे.
ratnagiri gas cylinder crisis
ratnagiri gas cylinder crisissarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. पश्चिम आशियातील संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्याने जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

  2. याचा परिणाम भारतातही जाणवत असून कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे.

  3. सिलिंडर वितरणातील अंतर 25 ते 28 दिवसांवरून 40 ते 45 दिवसांपर्यंत वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ratnagiri News : पश्चिम आशियातील संघर्षामुळे 'होर्मुझच्या सामुद्रधुनी' इराणने बंद केली आहे. यामुळे जगाचे नाक बंद केल्या सारखे झाले असून जग इंधानाच्या प्रश्नाने चिंतीत झाले आहे. याचा थेट परिणाम भारतावर देखील झाला असून देशभरात इंधन पुरवठ्यावर मोठा ताण निर्माण झाला आहे. राज्यातही याचे परिणाम दिसत असून कोकणात घरगुती गॅसचा पुरवठ्यासह व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे.

दरम्यान एकीकडे गॅस सिलिंडरमधील नियम बदलण्यात आला असून तो 25 दिवसावर नेण्यात आल्याने सर्व सामान्य हवाल दिल झाले आहे. त्यातच आता वितरकांचा मनमानी कारभार समोर येताना दिसत आहे. दोन सिलिंडरमधील अंतर 25 ते 28 दिवसांवरून थेट 40 ते 45 दिवसांवर गेल्याने रत्नागिरीत सर्व सामान्यांचे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण यावर प्रशासनाकडून कोणताच धोरणात्मक निर्णय होताना दिसत असून थेट हात वर केले जात आहेत.

नुकताच युध्द परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी घरगुती गॅस पुरवठ्याबाबत बैठक घेतली. त्यांनी घरगुती गॅस पुरवठ्याबाबत आढावा घेत जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस मिळण्यास कोणाची तक्रारी/अडचणी असल्यास जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथील भ्रमणध्वनी क्र. 7057222233 हा क्रमांकावर जाहीर केला.

ratnagiri gas cylinder crisis
Gas Cylinder Shortage : सावधान! गॅस सिलेंडरचा काळाबाजार, प्रशासन 'अ‍ॅक्शन मोड'वर, पोलिसांकडून खबरदारी

याचबरोबर जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून सर्व तालुका स्तरावर पथक स्थापन करुन पथकादवारे गॅस एजन्सींना वेळोवेळी भेट देऊन गॅस पुरवठ्याबाबत आढावा घ्यावा, भेटीचे वेळी ग्राहकांशीही बोलावे, त्यांचे अभिप्राय/काही अडचण असल्यास विचारावेत व जिल्हा कार्यालयास तात्काळ कळवावे, अशा सक्त सुचनाही अधिकाऱ्यांना केल्या.

यापूर्वी 2 सिलिंडरच्या बुकींगमध्ये 10 दिवसांचा गॅप होता. पण आता 25 दिवसांचा गॅप करण्यात आला आहे. गॅपबाबतचा फलक सर्व एजन्सीबाहेर लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जिंदल यांनी दिल्या होत्या. पण आता रत्नागिरीत वेगळाच प्रश्न उभा झाला आहे. येथे 2 सिलिंडरच्या बुकींगमधील गॅप तब्बल 40 ते 45 दिवसांवर गेला आहे. याबाबत साम टीव्हीचे प्रतिनिधी यांनी वितरकाशी संपर्क साधला असता हे गॅस बुकींगच्या सर्व्हचे कारण देण्यात आले आहे. यामुळे प्रशसान फक्त जिल्ह्यातील वितरकांना सुचना देत असून वितरकांशी निगडीत गोष्टींकडे सोयस्कर दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान शहरात घरगुती LPG गॅस सिलिंडर वितरणाच्या नियमात पुन्हा एकदा बदल करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. ग्रामीण भागासाठी दोन सिलेंडरमधील अंतर हे 45 दिवस तर शहरी भागात 40 दिवसांवर गेले आहे. यामुळे या नव्या अलिखीत नियमामुळे सर्व सामान्यांना तब्बल दीड महिन्यानंतर LPG गॅस सिलिंडर मिळणार असल्याची चर्चा होताना दिसत असून सर्व सामान्यांचे हाल होताना दिसत आहेत.

जिल्हा पुरवठा अधिकारी हे जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा व्यवस्थित चालू असल्याचे सांगत आहेत. तसेच ते सर्व सामान्य गॅस टंचाई होऊ शकते या शंकेने गॅससाठी बुकींग करत असून यामुळेच गर्दी होत आहे. तर बुकींग वाढल्याने वेटींगही वाढले असावे, पुरवठ्यामध्ये कोणतीही कपात नाही असे उत्तर देताना दिसत आहेत.

जिल्ह्यासाठी दैनंदिन सुमारे 6900 ते 7200 मागणी असून एचपीसीएल कंपनीचे मिरज हजारवाडी, बीपीसीएल कंपनीचे वाई, सातारा तर इण्डेन कंपनीचे सिलेंडर चाकण, पुणे येथून दररोज सरासरी 7500 घरगुती गॅस सिलेंडर प्राप्त होत आहेत. त्याप्रमाणेच त्याचे दररोज वितरण होत आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार व्यावसायिक सिलेंडरना गॅस देणे बंद करण्यात आल्याचेही माहितीही यावेळी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ratnagiri gas cylinder crisis
LPG Gas Cylinder Price News: मोदी सरकारची मोठी घोषणा; दिवाळीआधीच सर्वसामान्यांना दिलं मोठं 'गिफ्ट'

FAQs :

1. होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे काय परिणाम झाला आहे?
जागतिक इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून अनेक देशांमध्ये इंधन तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

2. भारतावर याचा काय परिणाम झाला आहे?
भारतामध्ये इंधन पुरवठ्यावर ताण निर्माण झाला असून काही भागात गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे.

3. कोकणात गॅस सिलिंडरचा तुटवडा का निर्माण झाला आहे?
जागतिक इंधन पुरवठ्यावर ताण आणि वितरणातील विलंब यामुळे कोकणात गॅस सिलिंडरची समस्या वाढली आहे.

4. सिलिंडर वितरणात किती विलंब होत आहे?
पूर्वी 25 ते 28 दिवसांत मिळणारा सिलिंडर आता 40 ते 45 दिवसांनी मिळत असल्याचे सांगितले जात आहे.

5. प्रशासनाने यावर काय भूमिका घेतली आहे?
सध्या प्रशासनाकडून कोणताही ठोस धोरणात्मक निर्णय झालेला नसल्याचे दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com