LPG Gas Cylinder Price News: मोदी सरकारची मोठी घोषणा; दिवाळीआधीच सर्वसामान्यांना दिलं मोठं 'गिफ्ट'

Modi Govt : उज्ज्वला गॅसधारकांना 700 रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर आता 600 रुपयांना मिळणार
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Delhi News: मोदी सरकारने दिवाळीआधीच सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. आता 'एलपीजी'वरील अनुदानात वाढ करत सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना 200 रुपयांऐवजी 300 रुपयांचे अनुदान मिळणार आहे. यापुढे उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना आता 600 रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बुधवारी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

याआधी रक्षाबंधनच्या निमित्ताने केंद्र सरकारने 200 रुपयांचे अनुदान उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना जाहीर केले होते. मात्र, या अनुदानामध्ये आता 100 रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे यापुढे आता 300 रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

Prime Minister Narendra Modi
Hasan Mushrif Guardian Minister : ...अखेर हसन मुश्रीफांची स्वप्नपूर्ती; पालकमंत्रिपदी पुनर्वसन तर चंद्रकांतदादा विस्थापित !

रक्षाबंधन आणि ओणमच्यानिमित्ताने एलपीजी सिलिंडर 200 रुपयांनी कमी केले होते. त्यामुळे त्यानंतर 'एलपीजी' सिलिंडरची किंमत 1100 रुपयांवरून थेट 900 रुपयांपर्यंत कमी झाली होती. तेव्हा या उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 700 रुपयांना गॅस मिळत होता.

पण आज घेण्यात आलेल्या निर्णयानुसार उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रुपयांचे अनुदान मिळणार असल्याने यापुढे लाभार्थ्यांना आता 600 रुपयांना गॅस मिळेल, अशी माहिती मंत्री ठाकूर यांनी दिली.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी कोणते निर्णय झाले ?

  • केंद्रीय हळद महामंडळ स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

  • तेलंगणामध्ये केंद्रीय आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली.

  • तसेच केंद्रीय आदिवासी विद्यापीठ 889 कोटींच्या खर्चातून करण्यात येणार आहे.

    Edited By- Ganesh Thombare

Prime Minister Narendra Modi
Nanded Hospital News: मोठी बातमी! नांदेड रुग्णालयातील मृत्यू प्रकरणाची हायकोर्टाकडून गंभीर दखल; सुमोटो याचिका दाखल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com