Kokan Politics: रामदास कदमांकडून ठाकरेंच्या गडाला सुरुंग; दापोलीत चार गावांतील ग्रामस्थांचा शिंदे गटात प्रवेश

कालच भाजप नेते नितेश राणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या विद्यमान उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला
Ramdas Kadam
Ramdas Kadam Sarkarnama

Kokan Politics: कोकणातील दापोली विधानसभा मतदार संघात पुन्हा एकदा ठाकरे गटाला खिंडार पाडण्यात शिंदे गटाच्या शिवसेनेला यश आले आहे. खेड तालुक्यातील खोपी गावातील जांभिलवाडी, अवकिरेवाडी व मिर्ले गावातील मानेवाडी येथील ग्रामस्थांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत कुंभाडं गावात हा पक्षप्रवेश करण्यात आला. (In Dapoli, the villagers of four villages joined the Shinde group)

शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन धाडवे व संघटक महेंद्र भोसले यांच्या प्रयत्नातून हा पक्षप्रवेश झाला. सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवसेना नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षात स्वागत करून आपल्या गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ अण्णा कदम हे देखील उपस्थित होते. दापोली विधानसभा मतदार संघात शिंदे गटाकडून ठाकरे गटाला शह देण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

Ramdas Kadam
Konkan Politics : कोकणात 'मविआ'ला दूसरा धक्का; नितेश राणेंनी केला करेक्ट कार्यक्रम

दरम्यान, कालच (१७ एप्रिल) कोकणाच्या राजकारणात महाविकास आघाडीला भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देखील . राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला. राष्ट्रवादीच्या (NCP) विद्यमान उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांनी सत्ताधारी ठाकरे गट व राष्ट्रवादीमधून बाहेर पडत असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

यामुळे देवगड जामसंडे नगरपंचायतीत सत्तांतर झाले. आज सकाळी लांजा येथे शिंदे गटाने ठाकरे गटाच्या पुर्वा मुळे यांच्यावरील अविश्वास ठराव 13- 0 ने जिंकला. त्यामुळे आज शिंदे गटासह भाजपने मविआला दोन धक्के दिल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मिताली सावंत (mitali sawant) यांनी भाजपला समर्थन दिल्यामुळे देवगड जामसंडे नगरपंचायतमध्ये भाजपचे 8 आणि मिताली सावंत असे एकूण 9 तर शिवसेनेचे 7 असे संख्याबळ आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com