ओसाड गावचे सेनापतीपद सांभाळून थकलोय; आता काहीतरी जबाबदारी द्या

तटकरेंनी आमदार भास्कर जाधव यांचावर टीकाटिप्पणी करण्याला बगल दिली.
Ramesh Kadam_Sunil Tatkare
Ramesh Kadam_Sunil TatkareSarkarnama

चिपळूण : रत्नागिरी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत धुसफूस वाढू लागली आहे. खासदार सुनील तटकरे नुकतेच चिपळुणात येऊन गेले. जिल्हा बैठकीत माजी आमदार रमेश कदम यांनी एकप्रकारे नाराजी व्यक्त केली, तर पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी बैठकीला दांडी मारली. (In Ratnagiri district meeting of NCP office bearers expressed their displeasure)

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक नुकतीच सावर्डे येथे पार पडली. या बैठकीसाठी खासदार तटकरे हे चिपळुणात एक दिवस आधीच मुक्कामाला होते. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत महामार्गावरील खड्डे व अन्य प्रश्नांविषयी बैठक बोलवावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र, त्याकडे काणाडोळा करण्यात आला.

Ramesh Kadam_Sunil Tatkare
मुश्रीफांनी शब्द खरा केला : सोमय्यांविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल

दरम्यान, झालेल्या बैठकीत गुहागर विधानसभा मतदार संघाविषयी तटकरे आक्रमक बोलतील, अशी कार्यकर्ते यांची अपेक्षा होती. मात्र, तटकरेंनी आमदार भास्कर जाधव यांचावर टीकाटिप्पणी करण्याला बगल दिली, त्यामुळे कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.

Ramesh Kadam_Sunil Tatkare
रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोला आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर कसा दिला?

खासदार सुनील तटकरे जिल्हा दौऱ्यावर आले असताना महामार्गावरील खड्डे व अन्य प्रश्नांविषयी प्रशासकीय अधिकाऱ्‍यांची बैठक घ्यावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याकडे केली होती. जिल्हा बैठकीच्या निमित्ताने तटकरे हे मुक्कामी आले होते. त्यामुळे सकाळच्या सत्रात बैठक घेणे शक्य होते; मात्र जिल्हा पदाधिकाऱ्यांनी तसे न करता केवळ बैठकीचे नियोजन केले. जनतेचे प्रश्न सुटणार नसतील तर ते योग्य नाही. या नाराजीतूनच मी बैठकीला अनुपस्थित राहिलो, असे चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी सांगितले.

तुमच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोचवू...

बैठकीत माजी आमदार रमेश कदम यांनी, आपल्या भाषणात मला पक्षाने काहीतरी जबाबदारी द्यावी. दीड वर्ष झाले. ओसाड गावचे सेनापती पद सांभाळून थकलो असल्याचे सांगत नाराजीचा सूर लावला. त्यांच्या या विधानावर खासदार सुनील तटकरे यांनी कोणत्याही प्रकारचा शब्द न देता, केवळ तुमच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोचवू, असे स्पष्ट केले. त्याचवेळी तटकरे यांनी आपला मतदार संघ दापोली, मंडणगडपर्यंत असल्याची सर्वांना जाणीवही करून दिली. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांच्या भूवयाही उंचावल्या. या बैठकीत माजी आमदार संजय कदम आणि सहदेव बेटकर यांच्यामध्येही खटके उडाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com