रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोला आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर कसा दिला?

सध्या आदिनाथ सहकारी साखर कारखाना बंद आहे.
Adinath Sugar factory
Adinath Sugar factory Sarkarnama
Published on
Updated on

करमाळा (जि. सोलापूर) : करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची  ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा  येत्या गुरुवारी (ता. ३० सप्टेंबर) ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. सध्या आदिनाथ सहकारी साखर कारखाना बंद असून गेली दीड वर्षापासून हा कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याच्या प्रक्रिया सुरू आहे. (How was the Adinath factory leased to Baramati Agro?)

राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो २५ वर्षांसाठी हा कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा करार करण्यात आला आहे. या प्रक्रियेला एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, अद्यापही आदिनाथ सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर कशा पद्धतीने चालविण्यास देण्यात आला , याची माहिती कोणालाही देण्यात आलेली नाही. विरोधी संचालक व इतर काही सभासदांनी भाडेतत्त्वाचा करार कसा केला, याची माहिती मागूनही त्यांना अद्याप मिळालेली नाही.

Adinath Sugar factory
पाच कारखाने ब्लॅकलिस्टमध्ये; शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन

कारखान्याच्या ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर विषय क्रमांक ९ हा आदिनाथ कारखाना हा बारामती अॅग्रोला भाडेतत्त्वावर  कशा पद्धतीने चालविण्यास देण्यात आला, याची माहिती व आढावा हा विषय टाकण्यात आला आहे. त्यामुळे या वार्षिक सभेनंतर आदिनाथ कारखाना नेमका कोणत्या कराराने भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यात आला आहे, यातून किती पैसे मिळणार? या मिळालेल्या पैशातून कोणाची देणी दिली जाणार? कामगारांच्या पगाराचे काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे अपेक्षित आहे, त्यामुळे आदिनाथ कसा भाडेतत्त्वावर दिला, हे या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर करमाळा तालुक्यातील जनतेला माहिती होणार आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या थकबाकीपोटी या बँकेने आदिनाथ सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया पूर्ण केली . त्यानुसार हा कारखाना बारामती अॅग्रोला २५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय मागील वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. तसा ठराव बहुमताने मंजूरही करण्यात आला आहे. मात्र एनसीडीसीचे २५ कोटी रुपये घेतलेले कर्ज भरले नसल्याने हा कर्जाचा आकडा व्याजासह ४५ कोटींच्या घरात गेला आहे. त्यामुळे एनसीडीसी बॅंक न्यायालयात गेली असून बारामती अॅग्रोला कारखाना देण्याची प्रक्रिया थांबली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, वस्तुस्थिती कोणीही सांगायला तयार नाही.

Adinath Sugar factory
राष्ट्रवादीच्या उमेदवारांची बंडखोरी; आघाडीला मोठा धक्का...

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर बागल गटाची सत्ता आहे. कारखाना भाडेतत्त्वावर देऊन तो सुरू व्हावा, असा बागल गटाचा प्रयत्न आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. चालू हंगाम सुरू होऊ शकत नाही. याचा परिणाम तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर निश्चितपणे होणार आहे. शिवाय हा कारखाना भाडेतत्त्वावर कशा पद्धतीने दिला? याची माहिती वारंवार मागणी करूनही का देण्यात आली नाही, हाही विषय चर्चेचा झाला आहे. मात्र, ही प्रक्रिया होऊन एक वर्ष संपत आले तरीही अजूनही आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com