Rane brothers politics : राणे बंधुंत कोणाची सरशी? भाजप vs शिवसेना लढतीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष

Nilesh Rane vs Nitesh Rane politics : कणकवली नगरपंचायतची निवडणूक झाल्यानंतर याची राज्यभर चर्चा झाली होती. आता या निवडणुकीचा निकाल काय लागणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Nagar Panchayat election
Nagar Panchayat electionsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. कणकवली नगरपंचायत निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  2. निकालाआधीच भाजपने विजयी रॅलीसाठी परवानगी मागितल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

  3. राणे बंधूंच्या प्रतिष्ठेची ही लढत ठरली असून रविवारी होणाऱ्या मतमोजणीत खरी कसोटी लागणार आहे.

Kankavli News : राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीचा निकाल उद्या रविवारी (21 डिसेंबर) लागणार असून उमेदवारांसह राजकीय पक्षांची आणि म्होरक्यांची धाकधूक वाढताना दिसत आहे. तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर निवडणुका पार पडल्या असून निकालकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच आता कणकवली नगरपंचायतची निवडणुकीत भाजप व शहर विकास आघाडीने विजयाची खात्री देत जल्लोषाची तयारी केली आहे. दरम्यान दोन्हीकडून विजयी रॅली काढण्यासह डीजे वाजविण्यासाठी थेट तहसीलदारांकडे मागणी केल्याने आता राज्यभर याची चर्चा सुरू झाली आहे.

राज्यातील रखडलेल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीचे दारे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उघडली होती. मात्र ही निवडणूक दोन टप्प्यात झाली. पहिल्या टप्प्यात 2 डिसेंबर रोजी 263 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले. तर उर्वरीत 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 143 सदस्यपदांच्या जागांसाठी आज मतदान झाले. तर दोन्ही टप्प्यातील मतमोजणी आणि निकाल हा रविवारी (21 डिसेंबर 2025) लागणार आहे.

पण त्याआधी राज्यभर चर्चेत राहिलेल्या कणकवली नगरपंचायतची निवडणूकीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. येथे कणकवली शहर विकास आघाडी विरोधात भाजप असा सामना रंगला होता. यावेळी येथे जोरदार शक्तीप्रदर्शनासह चुरशीने मतदान झाले होते. त्यामुळे येणाऱ्या निकालाकडे अख्ख्या राज्याचे लक्ष लागले आहे.

Nagar Panchayat election
Rane Brother Dispute : राणे बंधुंमध्ये शीतयुद्ध! व्हाॅट्सअपचा स्क्रीनशाॅट शेअर करत नितेश राणेंनी सुनावले,'धमकावणे बरोबर...'

यादरम्यान निवडणुकीत निकालापूर्वीच विजयी रॅलीमध्ये डीजे वाजविण्यासाठी शहर विकास आघाडीसोबतच भाजपने देखील परवानगी मागितल्याचे आता कळत आहे. दोन्हीकडून तसा अर्ज तहसीलदार कार्यालयात करण्यात आला आहे. तर आपल्या विजयाचा शंभर टक्के खात्री असल्याचा दावा दोन्हीकडून केला जातोय.

दरम्यान कणकवली शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर व भाजपचे उमेदवार समीर नलावडे या दोघांमध्ये कोण जिंकणार याकडे देखील लक्ष लागले आहे. संदेश पारकर यांना निवडुन आणण्यासाठी कणकवलीत शिंदे शिवसेनेचे कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी भाजपविरोधात रणशिंग फुंकले होते. त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे शिलेदार संदेश पारकर यांच्या शहर विकास आघाडीला पाठिंबा दिला होता. यामुळे निलेश राणे यांनी भाऊ तथा भाजपचे नेते व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याविरोधातच दंड थोपाटल्याचे उघड झाले होते. याचे पडसाद राज्यभर उमटले होते.

यासर्व घडामोडीनंतर आता आता रविवारी मतमोजणी होणार असून, येथे दोन्ही राणे बंधुची कसोटी लागणार आहे. पण त्याआधीच शहर विकास आघाडी सोबत भाजपच्या शहराध्यक्षांकडून कणकवली तहसीलदार कार्यालयात विजयी मिरवणुकी मध्ये डीजे वाजविण्यासाठी परवानगी मागितली आहे. पण अशा प्रकारची परवानगी अद्याप देण्यात आली नसली तरी शहर विकास आघाडी सोबत भाजपला १०० टक्के आपल्या विजयाची खात्री असल्याचे बोलले जात आहे. पण आता कोणाच्या अंगावर गुलाल पडणार? कोणाची विजयी रॅली निघणार आणि डीजे कोणाचा वाजणार हे आता आता उद्या लागणाऱ्या निकालानंतरच दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.

Nagar Panchayat election
Amol Mitkari On Rane Brothers : राणे बंधुंमध्ये वादाची ठिणगी? अमोल मिटकरींनी घेतली फिरकी, करून दिली रामायणाची आठवण

FAQs :

1. कणकवली नगरपंचायत निवडणूक का चर्चेत आहे?
➡️ राणे बंधू आमनेसामने आल्याने आणि निकालाआधीच भाजपने विजयी दावा केल्याने.

2. भाजपने कोणासाठी विजयी रॅलीची परवानगी मागितली?
➡️ भाजप समर्थित उमेदवार समीर नलावडे यांच्या विजयासाठी.

3. शहर विकास आघाडीचा उमेदवार कोण आहे?
➡️ संदेश पारकर.

4. निलेश राणे कोणाला पाठिंबा देत आहेत?
➡️ भाजपविरोधात शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर.

5. मतमोजणी कधी होणार आहे?
➡️ रविवारी मतमोजणी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com