100 Crore Corruption : विकासकामांमध्ये 100 कोटींचा भ्रष्टाचार? सत्ताधारी भाजप नगरसेविकेचा गंभीर आरोप, गैरव्यवहारावर उठवले प्रश्न

Khopoli Municipality Corruption 100 Crore Corruption Allegation By BJP Corporator : कोकणात सध्या राजकीय वाद पेटले असतानाच आता नगरपालिकेतील गैरव्यवहार व भ्रष्टाचाराच्या आरोपाने देखील वातावरण तापल्याचे दिसत आहे.
Khopoli Municipality Corruption Allegation
Khopoli Municipality Corruption Allegationsarkarnama
Published on
Updated on

Raigad News : नगरपालिकेतील मागील दोन ते तीन वर्षांतील विविध विकासकामांमध्ये तब्बल १०० कोटींचा गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप सत्ताधारी भाजपच्याच नगरसेविका सानिया शेख यांनी केला आहे. यामुळे खोपोली शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.

प्रभाग क्र. ६ मधील उर्दू शाळेच्या पटांगणातील क्रिकेट टर्फ, प्रभाग क्र. १४ मधील बहुचर्चित गार्डन, महामार्गावरील घड्याळ टॉवर, शहरातील सुशोभीकरणाची कामे, विविध प्रभागांतील उद्याने, हायमॅक्स उभारणी आणि प्रशासकीय बांधकामे यांसारख्या कामांवर सानिया शेख यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

या प्रकराणांची चौकशी नगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून न करता स्वतंत्र व वरिष्ठ स्तरावरून करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तसेच आपचे प्रदेश सचिव डॉ. रियाज पठाण यांनीही माहितीच्या अधिकारातून प्राप्त झालेल्या कागदपत्रांच्या आधारे गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे.

Khopoli Municipality Corruption Allegation
Councillors corruption : मलिदा वाटून खायचा! भाजपची सत्ता असलेल्या नगरपालिकेतील नगरसेवकांनी घेतली शपथ, व्हिडिओ व्हायरल...

आरोप फेटाळले

सानिया शेख व डॉ. रियाज पठाण यांनी केलेले १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप पूर्णपणे निराधार व जाणीवपूर्वक करण्यात येत असल्याचे खोपोली नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील व नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. संबंधित आरोप फेटाळून लावत, आरोप करणाऱ्यांविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Khopoli Municipality Corruption Allegation
Corruption Case : भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर सव्वादोनशे कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राम खाडे न्यायालयात जाणार!

भाजप-शिवसेनेची सत्ता

खोपोली नगरपालिकेत सध्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता असून राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची परिवर्तन विकास आघाडी विरोधात आहे. नगराध्यक्ष शिवसेनेचा असून उपनगराध्यक्षपद भाजपला देण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com