Councillors corruption : मलिदा वाटून खायचा! भाजपची सत्ता असलेल्या नगरपालिकेतील नगरसेवकांनी घेतली शपथ, व्हिडिओ व्हायरल...

Shahjahanpur councillors oath, Ganga water oath viral video, councillors corruption allegations : महानगरपालिका आयुक्त सौम्या गुरु राणी यांनी या व्हिडिओच्या सत्यतेबाबत चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी सांगितले की, हा व्हिडिओ २०२५ मधील आहे.
Shahjahanpur councillors viral video
Shahjahanpur councillors viral videoSarkarnama
Published on
Updated on

Shahjahanpur Municipal Corporation : काही नगरसेवक, आमदारांसह खासदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. सरकारी कामांमध्ये टक्केवारी घेतली जाते, अवैध पध्दतीने पैसे कमावले जातात, अशा स्वरुपाचे हे आरोप असतात. पण आता एका व्हिडिओने प्रशासकीय यंत्रणा आणि राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

उत्तर प्रदेशातील भाजपची सत्ता असलेल्या शाहजहांपूर महानगरपालिकेतील सुमारे ६० नगरसेवकांनी मलिदा वाटून खायचा, अशी शपथच घेतली असल्याचा दावा करणारा व्हिडिओ समोर आला आहे. प्रत्येकाने हातात पवित्र गंगाजल घेऊन हे शपथ घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावर नागरिकांसह राजकीय पक्षांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकं काय आहे व्हिडिओत?

शाहजहांपूर नगरपालिकेत भाजपचे ४१ नगरसेवक आहेत. या नगरसेवकांसह अन्य पक्षाचे किंवा अपक्ष असे सुमारे ६० नगरसेवक एकत्रितपणे शपथ घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. नगरपालिकेच्या माध्यमातून होणारी अवैध कमाई आणि कमिशनमध्ये सर्व नगरसेवकांचा समान वाटा असेल आणि एकमेकांसोबत गद्दारी करायची नाही, अशी शपथ हे नगरसेवक घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.

Shahjahanpur councillors viral video
Rahul Gandhi news : राहुल गांधींची जीवापाड मेहनत, पण बहीण प्रियांका गांधींसह पक्षातील प्रमुख नेत्यांचीच मिळेना 'सोशल' साथ; धक्कादायक वास्तव समोर...

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रजनीश गुप्ता यांनी भाजपवर निशाणा साधला. निवडून आल्यानंतर हे नगरसेवक सत्य आणि निष्ठेची शपथ घेतात. पण आता भ्रष्टाचार करण्याची शपथ घेत आहेत. नगरपालिकेत किती लूट होतेय, मुख्य सुत्रधार कोण आहे, कुणाकडे सर्वात मोठा हिस्सा आहे, याची चौकशी करावी, अशी मागणी गुप्ता यांनी केली आहे.

Shahjahanpur councillors viral video
तब्बल अर्धा कोटी फॉलोअर्स, पण तुकाराम मुंढे सोशल मीडियात एकाच नेत्याला करतात फॉलो...

चौकशीचे आश्वासन

महानगरपालिका आयुक्त सौम्या गुरु राणी यांनी या व्हिडिओच्या सत्यतेबाबत चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी सांगितले की हा व्हिडिओ २०२५ मधील आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, या व्हिडिओबाबत अद्याप महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांकडून अधिकृत कोणतेही विधान करण्यात आलेले नाही. त्यामुळे या व्हिडिओच्या सतत्येबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com