Video Maharashtra Konkan Politics : वक्त आने दो ...जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे, सामंत बंधुंच्या निशाण्यावर नारायण राणे ?

Shivsena Kiran Samant Uday Samant Challenge to Narayan Rane : या बॅनरवर उदय सामंत, किरण सामंत यांच्या फोटो सह बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत. उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या राजकीय वाटचालीस शुभेच्या असा मजकूर देखील
 Kiran Samant Uday Samant
Kiran Samant Uday Samant sarkarnama

Shivsena News : वक्त आने दो ...जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे, असा आशय असलेला बॅनर कणकवलीत शिवसेनेच्या शाखे बाहेर लागला आहे. या बॅनरवर उदय सामंत आणि किरण सामंत यांचे फोटो आहेत. हा बॅनर नेमका कोणाला इशारा देण्यासाठी याबाबत उलट सुलट चर्चा आहेत.

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात कुरबुरी सुरू झाली होती. निलेश राणेंनी तर थेट सामंत बंधुंवर आरोप केले. त्यातूनच हा बॅनर लावून नारायण राणेंना इशारा देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

या बॅनरवर उदय सामंत, किरण सामंत Kiran Samant यांच्या फोटो सह बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत. उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या राजकीय वाटचालीस शुभेच्या असा मजकूर देखील या बॅनवर असून शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकारी व शिवसैनिकांनी हे बॅनर लावले आहे.

 Kiran Samant Uday Samant
Video Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळ यांची अस्वस्थता राष्ट्रवादी काँग्रेसला कुठे नेणार?

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र, ही शिंदे गटाची जागा भाजपला BJP सोडण्यात आली. नारायण राणे येथून विजयी देखील झाले. मात्र, उदय सामंत यांच्या रत्नागिरी मतदारसंघात राणेंना अपेक्षित लीड मिळाले नाही.

लीड न मिळाल्याने नीलेश राणे यांनी थेट उदय सामंत आणि किरण सामंत यांच्यावर टीका केली. किरण सामंत हे रश्मी ठाकरेंना भेटले असून त्याचे पुरावे देखील आपल्याकडे असल्याचा दावा नीलेश राणे यांनी केला होता. नीलेश यांच्या या दाव्याला उदय सामंत यांनी उत्तर देत काही तक्रार असेल तर मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करा, असा टोला लगावला होता.

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर दावा सांगणार असल्याचे नीलेश राणे म्हणाले होते. त्यामुळे राणेंनाच उत्तर देण्यासाठी वक्त आने दो ...जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे, असे बॅनर लागल्याची चर्चा आहे.

 Kiran Samant Uday Samant
Video Western Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी सांगलीत फटाके फुटणार, जयंत पाटील अन् विश्वजीत कदम आमने-सामने?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com