Kokan News : राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे १३ ते १४ आमदार फुटणार : मंत्री सामंताचा खळबळजनक दावा!

Uday Samant : 'त्यांचे' हात रिकामे, मुख्यमंत्री भरभरून देणारे.." सामंतांनी डिवचलं.
Uday Samant
Uday SamantSarkarnama

Kokan Khed Rally : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज शिंदे गटातील नेते रामदास कदम यांच्यासाठी आज कोकणच्या खेडमध्ये सभा होणार आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मोठी सभा पार पडली होती. याच मैदानावरून आताउद्धव ठाकरेंना घेरण्याची रणनीती शिंदे गटाची आहे. आता याच वरून, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी पक्षप्रवेशाबाबत मोठा दावा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिवसेना ठाकरे गटाचे १३ ते १४ आमदार शिंदेंच्या गटात येणार असल्याचा दावा सामंत यांनी केला आहे. 'कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भातले १३ ते १४ आमदार आमच्या पक्षात प्रवेश करणार एवढं नक्की, असा मोठा दावा सामंत यांनी केला आहे. 'कोण कोण आमदार आमच्याकडे प्रवेश करणार, ते त्या आमदारांना आणि मुख्यमंत्री शिंदेंना यांनाच माहिती आहे, असे म्हणत त्यांनी सूचकपणे विरोधकांना खिंडार पडणार असल्याचे सांगितले.

Uday Samant
Bageshwar Baba News : राष्ट्रवादीच्या नेत्याचं बागेश्वर बाबाला सोलापूरला येण्याचं निमंत्रण : नेटकरी पडले तु़टून!

आजची सभा काही प्रत्युत्तर देण्यासाठी नाही. ५ तारखेच्या सभेत ठाकरेंनी सांगितले की, माझ्याकडे द्यायला काहीच नाही. मात्र आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच यावर बोलतील. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. मी भरभरून देणारा आहे. जे जे काही कोकणाला देण्यालसारखं आहे. आणि त्याचीच उधळण मुख्यमंत्री शिंदे आजच्या सभेत करतील. आमचे हात रिकामे आहेत, तरीही तुम्ही सोबत राहिलात, अशी सहानुभूती मिळवणारे भाषण शिंदे करणार नाहीत, असा ही टोला सामंत यांनी लगावला.

Uday Samant
Kokan Politics : मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वीच रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर आगपाखड; म्हणाले...

५ तारखेला सभा ही सभा नव्हती. त्यामध्ये फक्त शिव्या होत्या. कुणी कुणाला लांडगा तर कुणी कोल्हा म्हणत होता. इकडे काही लोकांचं म्हणण आहे की, भाजपकडे वॉशिंग मशिन आहे. मग विचार बदलणारं मशिन कोणाकडे आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आजच्या सभेतून विकासाची दिशा स्पष्ट होईल, असेच भाषण मुख्यमंत्र्यांचं असेल, असे सामंत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com