विधान परिषद निवडणुकीच्या पराजयानंतर शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शेकापची मत ठाम असल्याचे सांगताना शिवसेना आणि काँग्रसच्या मतांवर भाष्य केल होत. त्यावर काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत (Mahendra Gharat) यांनी जयंत पाटील यांना खडे बोल सुनावले आहेत.
शेकाप नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्यातील शाब्दीक युद्ध रंगले आहे. रायगडमध्ये आघाडीत बिघाडीची चिन्ह दिसू लागली आहेत. अलिबाग,पेणमध्ये काँग्रेसची मतं अनंत गीतेंना मिळाली किंवा नाहीत यावर बोलण्याचा अधिकार जयंत पाटलांना नाही. कारण तेच या संपूर्ण निवडणुकीचे सूत्रधार होते," असे खडे बोल महेंद्र घरत यांनी जयंत पाटील यांना सुनावले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालावर जयंत पाटील म्हणाले, "आपली मते कमी झालेली नाहीत. शिवसेनेचे मते मिळाली हवी होती ती मिळाली नाहीत. काँग्रेस आणि शिवसेनेचे पदाधिकारी बाहेर पडले नाहीत. आपल्याला वाटले शिवसेना 10 ते २० हजार मतांनी येईल, पण तसे झाले नाही. शेकापचे मते ठाम आहेत,"
"ज्या लोकांनी आघाडीच्या विरोधात काम केले. त्यांच्या चौकशीसाठी माझी समिती स्थापन केली आहे. त्या समितीचे काम सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत जयंत पाटील हेच आघाडीवर होते," असे स्पष्टीकरण महेंद्र घरत यांनी दिले आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या पराभवावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. विधान परिषद निवडणुकीत चार चार मत देण्याचे ठरवले होते. मात्र काँग्रेसकडून ती चार मते मिळाली नाहीत.जर ती मते मिळाली असती तर विजयाच्या जवळपास पोहोचलो असतो. काँग्रेस फुटलेल्या मतांवर कारवाई करेल. पण आज ना उद्या मी पुन्हा एकदा विधिमंडळात येईन अशी मला खात्री आहे, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
दर पाच वर्षांनी शेतकरी कामगार पक्षाचे अधिवेशन होत असते. यंदा हे अधिवेशन 2 ऑगस्ट रोजी पंढरपुरात होत आहे. किमान सात ते आठ हजार कार्यकर्ते या अधिवेशनासाठी दाखल होतील. यंदा या अधिवेशनाला मित्र पक्षांना देखील आमंत्रित करणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.