Marathi Films Artists Protest: "बा विठ्ठला" मराठी चित्रपटांना थिएटर मिळू दे ! ; शिंदे सरकारच्या विरोधात निर्माते, कलाकारांचे विठुरायाला साकडे

Marathi films News : हिंदी चित्रपटाप्रमाणेच मराठी चित्रपटांना शेअरिंग पध्दतीने थिएटर मिळावेत..
CM Eknath Shinde
CM Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Marathi Films Artists Protest In Pandharpur: "मराठी चित्रपटाला महाराष्ट्रात थिएटरमध्ये स्क्रीन मिळावे," यासाठी मराठी चित्रपटाचे निर्माते, कलाकारांनी आज (गुरुवारी) पंढरपुरात विठुरायाला साकडे घातले. यानिमित्ताने मराठी चित्रपटांना महाराष्ट्रातच थिएटर मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अमीर शेख यांनी मराठी चित्रपट तयार केला आहे. हा चित्रपट तयार होऊन जळपास सहा महिने उलटून गेले आहेत. चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी थिएटर मिळत नसल्याने निर्माता आणि कलाकार हतबल झाले आहेत.

CM Eknath Shinde
Opposition Parties Meeting : 'INDIA 'नावावरुन वाद ; २६ विरोधी पक्षांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार

अमीर शेख आणि कलाकारांनी सरकारचे लक्ष वेधून‌ घेण्यासाठी आंदोलन‌ही केले . "बा विठ्ठला" मराठी चित्रपटांना थिएटर मिळू दे , ‌असं साकडं विठ्ठलाला घातल्याचे अमीर शेख यांनी सांगितले.

"राज्य सरकारने आणि मराठी भाषेचा ठेंबा मिरवणाऱ्या कोणत्या ही राजकीय पक्षाने त्यांची दखल‌ घेतली नाही. हिंदी चित्रपटांना शेअरिंग पध्दतीने थिएटर उपलब्ध करून दिली जातात. मात्र दुसरीकडे‌‌ मराठी चित्रपटांना टक्के वारीवर थिएटर दिली‌ जातात," असे शेख यांनी सांगितले.

CM Eknath Shinde
Irshalwadi Landslide Incident: इर्शाळवाडीवर दरड कोसळली ; शंभरहून अधिक लोक अडकल्याची भीती; दहा जणांचा मृत्यू

हिंदी चित्रपटाप्रमाणेच मराठी चित्रपटांना शेअरिंग पध्दतीने थिएटर मिळावेत, अशी‌ मागणी ही शेख यांनी केली आहे. राज्य सरकारने मराठी चित्रपटांसाठी वर्षातून‌ चार आठवडे थिएटर उपलब्ध करून देण्याच्या सूचना मालकांना‌ दिल्या आहेत.

सूचनांचे पालन न करणाऱ्या मालकांना दहा लाख दंडाची तरतूद ही केली आहे. राज्य सरकारने हा कालावधी वाढवून तो दररोज दोन शो देण्यासाठी नवीन आदेश काढावेत, अशी मागणीही शेख यांनी केली आहे. या संदर्भात राज्य सरकार व राजकीय नेत्यांनी अद्याप याची दखल घेतली नाही.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com