

नगरपरिषद–नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात राणे बंधूंचा संघर्ष चिघळला आहे.
निलेश राणे यांनी भाजपवर पैसे वाटपाचे आरोप केल्यानंतर नितेश राणे यांनी तीव्र प्रत्युत्तर दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “जो योग्य आहे त्याच्याच बाजूने” असल्याचे सांगत प्रकरणाला नवा राजकीय रंग दिला.
Sindhudurg News : तळकोकणात नगरपरिषदा आणि नगरपालिकेंच्या निवडणुकीचा धुरळा उडाला असून उद्या मंगळवारी (ता.2) मतदान होणार आहे. पण त्याआधी येथे भाजप आणि शिवसेनेत सतत संघर्ष सुरू झाला आहे. ज्यामुळे निलेश राणे आणि नितेश राणे या राणे बंधूंमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. दोन्ही बंधू एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यावर वादावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी जो योग्य आहे, आपण त्याच्याच बाजूने असल्याचे म्हटले आहे. यामुळे भाजपवर आरोप करणाऱ्या निलेश राणेंना उपमुख्यमंत्री निलेश राणेंना फडणवीस यांचेही बळ मिळाल्याचे येथे बोलले जात आहे.
नुकताच निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकत स्टिंग ऑपरेशन केलं होते. तसेच येथे पैशाने भरलेली बॅग माध्यमांसमोर आणत येथे मतदारांना विकत घेण्याचा डाव भाजप आखत असल्याचा आरोप केला होता. तर अशा पैशांच्या बॅगा येथे उतरण्याचे काम प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणच करत असल्याचा आरोप केला होता. ज्यानंतर चव्हाण यांनी आपल्याला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची असल्याचे म्हणत शिंदेंनाच इशारा दिला होता.
यानंतर या वादात थेट पालकमंत्री नितेश राणे यांनीच उडी घेत निलेश राणेंचा बळीचा बकरा केला जातोय. चव्हाण यांच्यावर आरोप करण्यासाठी त्यांना पुढे केलं जातयं. त्यांच्यावर आरोप करताना दुसरा नेता का बोलत नाही. तर चव्हाण यांच्यावर जे आरोप केलेत त्यात तथ्य नाही असे म्हणत जोरदार टीका केली होती. आमचे स्वतःचे व्यवसाय पण असतात. स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले तर त्यात चूक काय?, आमच्या पक्षाची कोणी बदनामी करू नये. प्रत्येकाचे व्यवसाय आहेत. जो नियम आम्हाला लागतो तो नियम सगळ्यांना लागणार हमाम मैं सब नंगे है, असं म्हणत नितेश राणेंनी पलटवार केला होता.
यावर निलेश राणेंनी उत्तर देताना, बळीचा बकरा होण्याइतपत मी काही दूध खुळा नाही असे म्हणत जे पैशांच्या जीवावर चाललय ते मी फक्त रोखायचं काम करतोय. हे थांबवण्यासाठीच भाजपने दबाव आणून गुन्हा दाखल केला आहे. असा 1 काय 10 गुन्हे दाखल केले तरी आता थांबणार नाही... जो शिवसेनेवर वार करण्याचा प्रयत्न करेल त्यांना सोडणार नाही, असा दम भरला होता.
यामुळे येथे आधी जागावाटप आणि नगराध्यक्षपदाच्या वादावरून युतीत फूट पडल्यानंतर आता दोन बंधुंमध्ये राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी कोकणाचा दौरा करताना थेट मालवणमध्ये नारायण राणेंची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. मात्र प्रचार सभेत निलेश राणेंच्या मागे आपल्यासह पूर्ण शिवसेना असल्याचे सांगत इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणेच करेगा असे म्हटले होते. यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी, मी सगळ्यांच्याच पाठीशी आहे. जो चांगला काम करतो त्याच्या पाठीशी मी नक्कीच उभा आहे. कोणी चुकला तर त्याला मी सांगेन.भले तो माझ्या पक्षाचा असला तरी. मी चुकीच्या मागे उभा राहत नाही. जे काही योग्य असेल त्याच्या मागे मी उभा राहतो. तसेच सध्या जे कोकणात सुरू आहे. जी काही परिस्थिती पाहायला मिळते आहे ती योग्य नाही. तेथे जो राणे विरूद्ध राणे असा वाद सुरू आहे. तो काही योग्य नाही आहे. निश्चितपणे या निवडणुकीनंतर या संदर्भात आम्हा सर्वांना आत्मचिंतन करावे लागणार असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
1. राणे बंधूंचा वाद कशामुळे सुरु झाला?
निलेश राणे यांनी भाजप नेत्यांवर विशेषतः रवींद्र चव्हाण यांच्यावर पैसे वाटपाचे आरोप केले.
2. नितेश राणे यांनी काय प्रतिक्रिया दिली?
ते म्हणाले की निलेश राणे चुकीचे आरोप करत असून त्यांनी पलटवार केला.
3. फडणवीस यांनी वादावर काय प्रतिक्रिया दिली?
फडणवीस म्हणाले की “जो योग्य आहे, आपण त्याच्याच बाजूने,” ज्यामुळे चर्चेला आणखी उधाण आले.
4. हा वाद कोणत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडतो आहे?
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक 2025.
5. फडणवीस यांच्या वक्तव्याचा नेमका परिणाम काय मानला जातो?
निलेश राणेंना या वक्तव्यामुळे राजकीय बळ मिळाल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.