सिंधुदुर्ग : महाविकास आघाडीतील तीन मंत्री आज कोकण दौऱ्यावर आहेत. युवासेना प्रमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) सिंधुदुर्गमध्ये, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये तर जलसंपदा मंत्री जयंत पाटील चिपळूण दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या तीनही मंत्र्यांच्या दैाऱ्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यातून हे तीनही मंत्री काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आजपासून तीन दिवसाच्या कोकण दौर्यावर आहेत. भाजप नेते, आमदार नितेश राणे यांच्या विधानसभा मतदार संघात ठाकरेंची सभा होणार आहे. त्याच्या दौऱ्याची सुरुवात सिंधुदुर्गातून होणार आहे.
आदित्य ठाकरे हे यावेळी मालवण येथे बंदर जेटीची पाहणी करणार आहेत व फिश अॅक्वेरियमच्या कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर ते देवगड येथील कुणकेश्वर मंदिराला भेट देऊन दर्शन घेणार आहेत.
दुपारनंतर ते वेंगुर्ला वांयगणी येथे कासव जत्रेला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर वेंगुर्ले येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. प्रस्तावित पाणबुडी प्रकल्प व जलपर्यटनासाठी प्रस्तावित वेंगुर्ल्यातील बंदर जेटीची पाहणी ते करणार आहेत.
संध्याकाळी सिंधुरत्न समृद्ध योजनेचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. रात्री उशिरा कुडाळ येथे पारंपारीक शिमगोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
रात्री ते कुडाळमधे मुक्काम करून सकाळीच ते रत्नागिरी जिल्ह्यांच्या दौर्यासाठी प्रयाण करणार असल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यातून हे तीनही मंत्री काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील काही कालावधीमध्ये होत असलेल्या घडामोडी, राणे विरुद्ध शिवसेना असा वाद, जिल्हा बँक निवडणुकीच्या वेळी झालेले राजकारण, शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरण यानंतर आदित्य ठाकरे पहिल्यांदा तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर येत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.