crime news : कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार! ई-केवायसीच्या नावाखाली महिलेचा फोन घेतला अन् अश्लील मेसेज आणि व्हिडिओ

ladki bahin yojana kalyan kyc cyber crime news : काहीच दिवसांपूर्वी लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसी करण्यासाठी एका एजंटने महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली होती.
Ladki Bahin Yojana Scam 1
Ladki Bahin Yojana Scam 1Sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. लाडकी बहिण योजनेच्या केवायसीच्या नावाखाली बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून गैरप्रकार.

  2. महिलेच्या नावाने अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवल्याचा आरोप.

  3. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून आरोपीला नोटीस देण्यात आली.

kalyan crime news : लाडकी बहिण योजनेच्या केवायसी करण्याच्या नावाखाली महिल्यांची लूट होण्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. तोच काही दिवसांच्या आधी एका एजंटने ई-केवायसी करून देण्यासाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली होती. या घटनेनं राज्यभर संतापाची लाट उसळली होती. अद्याप हे प्रकरण चर्चेतून जात नाही तोच कल्याणमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे एका खाजगी एजंटने महिलेच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून अश्लील मेसेज आणि व्हिडिओ इतरांना पाठवल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. यानंतर आता पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

राज्यात एकीकडे लाडक्या बहि‍णींसाठी राज्य सरकार मोठं मोठ्या घोषणा करत आहे. तर दुसरीकडे याच लाडक्या बहि‍णींना लुटण्यासह त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी केली जात आहे. या घटनांमुळे राज्यातील लाडक्या बहिणी दबावाखाली असतानाच आता पुन्हा एका खाजगी एजंटने धक्कादायक आणि घृणास्पद प्रकार केला आहे. रूतिक खंडारे असे त्याचे नाव असून त्याने महिलेच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून अश्लील मेसेज आणि व्हिडिओ इतरांना पाठवल्याचे उघड झाले आहे.

रूतिक खंडारे याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढे तपास सुरू आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे हा घृणास्पद प्रकार करणाऱ्याला पोलिसांनी नोटीस देऊन सोडून दिल आहे. यामुळे आता पोलिसांच्या कर्तव्यावरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कल्याणमधील मोहने परिसरातील एका महिलेला लाडकी बहिण योजनेअंतर्गत पैसे येत नव्हते. चौकशी केल्यानंतर केवायसी न झाल्यामुळे पैसे येत नसल्याचे तिला समजले.

Ladki Bahin Yojana Scam 1
Pune Crime News : पुणे पुन्हा हादरलं! नसरापूरनंतर चाकणमध्ये 3 वर्षांच्या बालकावर अत्याचार करून हत्या; मृतदेह सुटकेसमध्ये

दरम्यान परिसरातील काही लोकांच्या सांगण्यावरून तिने रूतिक खंडारे नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधला. जो ई-केवायसी करून देतो अशी माहिती देण्यात आली होती. त्याप्रमाणे संबंधित महिलेने केवायसी करण्यासाठी रूतिक खंडारे याच्याशी संपर्क साधला. यावेळी खंडारे याने केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि एक हजार रुपये घेतले. तसेच ओटीपी प्रक्रियेसाठी महिलेचा मोबाईल देखील काही वेळासाठी स्वतःकडे ठेवून घेतला. मात्र, काही दिवस उलटल्यानंतरही केवायसी पूर्ण झाली नाही आणि महिलेला पैसे मिळाले नाहीत.

यामुळे संबंधित महिलेने हा विषय मनावर घेतला नाही पण काही दिवसांनी संबंधित महिलेपाशी एक व्यक्ती येऊन तक्रार करू लागला. तसेच तिच्या नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून त्याला अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवले जात असल्याची तक्रार केली. ही धक्कादायक बाब ऐकून ती महिला चक्रावलीच. कारण तिला इंस्टाग्रामबद्दल काहीही माहितीही नव्हती.

यानंतर संबंधित महिलेने या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात जावून तक्रार देत घडलला सर्व प्रकार सांगितला. ज्यानंतर रूतिक खंडारे याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखळ करून घेतला. सध्या पोलिस पुढील तपास करत आहेत. या प्रकरणात खंडारे याला नोटीस देण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana Scam 1
Badlapur Crime News : बदलापूर नगरपरिषदेत भ्रष्टाचाराचा पर्दाफाश, ACB च्या कारवाईत धक्कादायक प्रकार उघड, आता आणखी काही आधिकारी अडकणार...

FAQs :

1. या प्रकरणात नेमका काय प्रकार घडला
महिलेच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून अश्लील मेसेज पाठवले गेले

2. हा प्रकार कशाशी संबंधित आहे
लाडकी बहिण योजनेच्या केवायसी प्रक्रियेशी संबंधित आहे

3. पोलिसांनी काय कारवाई केली
गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि आरोपीला नोटीस दिली

4. आरोपी कोण आहे
केवायसी करणारा खाजगी एजंट असल्याचे सांगितले जाते

5. या प्रकारातून काय शिकायला मिळते
ऑनलाइन माहिती देताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com