Pune Crime News : पुणे पुन्हा हादरलं! नसरापूरनंतर चाकणमध्ये 3 वर्षांच्या बालकावर अत्याचार करून हत्या; मृतदेह सुटकेसमध्ये

Pune Mahalunge Murder Case : नसरापूर येथील चिमुकलीच्या घटनेने सबंध महाराष्ट्र हळहळत असतानाच पुण्यातील चाकण औद्योगिक पट्ट्यात येणाऱ्या महाळुंगे परिसरात देखील अशीच धक्कादायक घटना घडली आहे.
Pune Police
Pune Policesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. पुण्यातील चाकण परिसरात तीन वर्षांच्या बालकाचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळला

  2. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे

  3. आरोपीचा शोध सुरू असून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे

Pune News : नसरापूर येथील चिमुकलीच्या तिच्या घटनेने सबंध महाराष्ट्र हळहळत असतानाच, पुण्यातील चाकण औद्योगिक पट्ट्यातील दक्षिण महाळुंगे परिसरातून काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका अवघ्या तीन वर्षांच्या निष्पाप बालकावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. तसेच पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीने मृतदेह सुटकेसमध्ये भरून ठेवल्याचे उघड झाले आहे. यावरून आता पुण्यात एकच खळबळ उडाली असून आता संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बालक घरातून बेपत्ता झाल्यापासून त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. दरम्यान, दक्षिण महाळुंगे येथील एका निर्जन ठिकाणी या बालकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. अज्ञात नराधमाने बालकावर प्रथम अनैसर्गिक अत्याचार केले आणि त्यानंतर गळा चिरून त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली.

घटनेची माहिती मिळताच महाळुंगे आणि चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी तपासाच्या सूचना दिल्या. तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत बिहार राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असतानाच आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

Pune Police
BJP leader nephew murder case : थरार! भाजप नेत्याच्या पुतण्याची दिवसाढवळ्या हत्या, पोलिसांनी काही तासांतच...

महाळुंगे दक्षिण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे. आरोपी हा देखील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा असून तो मूळचा बिहारचा असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच पीडित बालकाचे कुटुंब देखील मूळचे मध्य प्रदेशातल्या असून ते या ठिकाणी कामानिमित्त आले होते. या गंभीर घटनेचा पोलीस प्रशासनाकडून सखोल तपास सुरू आहे.

तपासासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली होती. तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान औद्योगिक पट्ट्यात घडलेल्या या कृत्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. अशा विकृत मानसिकतेच्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Pune Police
IRS officer daughter murder case : IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार करून हत्या; पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर येताच देश हादरला...

FAQs :

1. ही घटना कुठे घडली आहे
पुण्यातील चाकण औद्योगिक पट्ट्यातील महाळुंगे परिसरात ही घटना घडली आहे

2. या प्रकरणात काय आढळले
एका तीन वर्षांच्या बालकाचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळून आला

3. पोलिसांनी काय कारवाई केली आहे
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे

4. आरोपीबाबत काय माहिती आहे
सध्या आरोपीचा शोध सुरू असून तपास प्रगतीपथावर आहे

5. या घटनेचा समाजावर काय परिणाम होऊ शकतो
अशा घटनांमुळे बालसुरक्षेबाबत चिंता वाढू शकते आणि कडक कारवाईची मागणी होऊ शकते

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com