Narayan Rane : नारायण राणेंच्या जिभेला धार चढणार!

Ratnagiri–Sindhudurg constituency Narayan Rane :हा विजय मिळविल्यानंतर मात्र, राणेंना बाराहत्तीचे बळ चढणार आणि त्यांच्या जिभेला अधिक धार चढणार असल्याचे आता बोलले जात आहे.
Narayan Rane
Narayan Ranesarkarnama
Published on
Updated on

Lok sabha Election : बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिका राहिलेल्या मात्र, पुढच्या काळात उद्धव ठाकरेंच्या नावाने खडे बोलून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला. साधारपणे 2005 मध्ये म्हणजे, सलग 20 वर्षे ठाकरी भाषेपेक्षा जहरी, बोचऱ्या, लाजिरवाण्या शब्दांत ठाकरेंना बोलणाऱ्या नारायण राणेंच्या जिभेला आता पुन्हा धार चढणार आहे.

अर्थात, रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजपकडून लढणाऱ्या राणेंना आता पहिल्यांदा लोकसभेत जाण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, ठाकरेंनी बळ भरलेल्या आणि राणेंना पुरून उरण्याची भाषा करणाऱ्या खासदार विनायक राऊत पाडून राणे पहिल्या मानाने संसेद जातील, असे लोकसभा निवडणुक निकालाच्या पहिल्या फेरीचे चित्र आहे.

निकालात राणेंनी घेतलेली आघाडी कायम राहिल्यास राणे खासदार होऊ शकतील. हा विजय मिळविल्यानंतर मात्र, राणेंना बाराहत्तीचे बळ चढणार आणि त्यांच्या जिभेला अधिक धार चढणार असल्याचे आता बोलले जात आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुलूख मैदानी तोफ ते काँग्रेस नेते असा प्रवास करून भाजपमध्ये विसावलेले नारायण राणेंसाठी विनायक राऊतांचा पराभव म्हणजे थेट उद्धव ठाकरेंचा पराभव असेच गणित राहणार आहे.

Narayan Rane
Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Updates : परभणीत संजय जाधवच 'BOSS', जानकरांचा एक लाख 33 हजार मतांनी पराभव

राणे हे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सातत्याने तोफ डागत असतात. मात्र, मैदानात नारायण राणेंचा 2014 ला ठाकरेंचे शिलेदार वैभव नाईक यांनी पराभव केला होता. त्यामुळे यंदा राणे मैदानावर जिंकले तर त्यांच्या जिभेला आणखी धार चढणार हे निश्चित

निकालाचा दिवस चिंतेचा आहे. नारायण राणेंच्या राजकीय कारकि‍र्दीचे सर्वात वाईट वर्ष 2014 वर्ष ठरले. त्या वर्षभरात कोकणच्या आपल्या घरच्याच मैदानावर लोकसभा निवडणुकीत मुलगा निलेश राणेचा पराभव आणि विधानसभेत स्वतः नारायण राणे पराभूत झाले.

Narayan Rane
Lok Sabha Election Result Live : भाजपला स्वबळावर बहुमत नाहीच; 'इंडिया'ची मुसंडी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com