Kudal Assembly Constituency 2024 : निलेश राणे वडिलांच्या पराभवाचा वचपा काढणार? ‘एक्झिट पोल’ने वाढवली धडधड

Nilesh Rane plans revenge for Narayan Rane's loss: कुडाळ मालवण मतदारसंघात शिवसेना यूबीटी पक्षाचे उमेदवार वैभव नाईक आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार निलेश राणे यांच्यात थेट लढत होते आहे.
Nilesh Rane, Vaibhav Naik
Nilesh Rane, Vaibhav NaikSarkarnama
Published on
Updated on

Kudal News : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार वैभव नाईक आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यात थेट लढत होत आहे. या हायहोल्टेज लढतीत निलेश राणे बाजी मारण्याची शक्यता आहे. आपल्या वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ते या निवडणुकीत उतरल्याचे मानले जाते. त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

‘साम टीव्ही’च्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, कुडाळ मालवण मतदारसंघात निलेश राणे विजयी होऊ शकतात. नाईक हे दोन टर्म आमदार असून त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्याचे मानले जाते. मात्र, राणे यांनीही मागील काही वर्षांपासून या मतदारसंघात पक्षबांधणी जोरकसपणे सुरू केली होती. अनेक पक्षप्रवेशही झाले आहेत. लाडकी बहीण योजनेचा फायदाही राणेंना होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Nilesh Rane, Vaibhav Naik
Top 10 News : लाडक्या बहिणी तारणार? 'वंचित'चा पाठिंबा..! आंबेडकरांनी केली भूमिका स्पष्ट - वाचा महत्त्वाच्या घडामोडी

शिवसेनेमध्ये पडलेली फूट, हा मुद्दा निवडणुकीत सर्वात महत्वाचा ठरणार आहे. दोन्ही शिवसेनेतच ही लढत होत आहे. निलेश राणे यांनी निवडणुकीच्या आधी भाजपमधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसनेत प्रवेश उमेदवारी मिळवली आहे. वैभव नाईक यांचा पराभव करायचाच, या हेतूने राणे कुटुंबाने जाणीवपूर्वक पक्ष बदलत निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जाते.

याच मतदारसंघात वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचा 2014 मध्ये पराभव केला होता. त्यामुळे वडिलांच्या पराभवाचा वचपा निलेश राणे काढणार का, याबाबत उत्सुकता आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी तसे संकेतही दिले होते. त्यासाठी त्यांनी निकराचे प्रयत्नही केले आहेत. त्याचे फळ त्यांना मिळू शकते, असे ‘साम टीव्ही’च्या एक्झिट पोलमध्ये दिसते.

Nilesh Rane, Vaibhav Naik
Sharad Pawar : शरद पवारांनी सरकार स्थापनेचा आकडा सांगितला; 'मविआ'चा 'कॉन्फिडन्स' वाढला

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काही महिन्यांपूर्वीच कोसळला आहे. त्याचा परिणाम या निवडणुकीवर होण्याची शक्यता असल्याचे सांगिजले जात आहे. त्याचप्रमाणे बागायददारांच्या प्रश्नांनीही डोके वर काढले होते. मच्छिमारांचे प्रश्न, रस्त्यांची दुर्दशा, दळणवळणाची अपुरी साधने हे सगळे मुद्दे प्रभावी ठरण्याची शक्यता आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com