Zilla Parishad Election : शिवसेना भाजपच्या वादामुळे इच्छुकांचे भवितव्य टांगणीला? महायुती न झाल्यास ठाकरेंच्या शिवसेनेशी अटीतटीची लढत

BJP Shivsena Vs Shivsena UBT : आगामी स्थानिकच्या आधीच येथे शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद समोर येत आहेत. भाजपने सिंधुदुर्गमध्ये स्वबळाचा नारा दिल्याने याचा परिणाम रत्नागिरीत होण्याची शक्यता आहे.
Zilla Parishad Election
Zilla Parishad Electionsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. पावस जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवारीसाठी हालचाली करत आहेत.

  2. गावखडी, पूर्णगड आणि पावस परिसरात अल्पसंख्यांक मतदार निर्णायक भूमिका बजावणार आहेत.

  3. भाजप-शिंदे युती झाली तर ठाकरे गट विरुद्ध महायुती असा सामना; अन्यथा तिरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.

Ratnagiri News : तळकोकणात महायुतीत मिठाचा खडा पडला असून याचे पडसाद आता कोकणात उमटण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील भाजपने सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकला चलोची भूमीका घेत स्वबळाचा नारा दिला आहे. यामुळे रत्नागिरीत आता युती होणार की शिवसेना देखील स्वबळाचा नारा देणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तर शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असणाऱ्या या वादामुळे मात्र इच्छुकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. तर इच्छुकांकडून सध्या परिस्थितीचा कानोसा घेऊनच वाटचाल करण्याकडे कल दिसत आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर पावस जिल्हा परिषद गटात सर्वच पक्षातील इच्छुकांनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणे महायुती झाल्यास शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच सामना येथे होणार असे निश्चित मानले आहे. तर पण अद्याप महायुतीचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला नसून यात आता सिंधुदुर्गमध्ये भाजपने घेतलेल्या भूमिकेमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या वादामुळेच आता शिवसेना-भाजपच्या इच्छुक उमेदवारांचे भवितव्य सध्या अडचणीत आले आहे. येथे महायुती झाली नाही, तर तिरंगी लढत होणार अशीही सध्या चर्चा आहे.

पावस जिल्हा परिषद गट सर्वसाधारण पुरुष गटाकरिता आरक्षित झाल्यामुळे ठाकरे गटाकडून दोघांची, तर भाजपकडून एकाचे नाव पुढे येत आहे. शिंदे शिवसेनेकडूनही दोघांनी इच्छा व्यक्त केल्याची चर्चा सुरू आहे. पावस जिल्हा परिषद गटात ठाकरे शिवसेनेचे वर्चस्व आहे. या मतदारसंघातील गावखडी, पूर्णगड व पावस या परिसरात अल्पसंख्यांक मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच अन्य मतदारांचे पाठबळ ठाकरे शिवसेनेला मिळू शकते. भाजप व शिंदे शिवसेना यांची युती झाल्यास ठाकरे गट विरुद्ध महायुती असा थेट सामना होऊ शकतो; अन्यथा तिरंगी लढतीची शक्यता आहे.

Zilla Parishad Election
Zilla Parishad Election : भाजपच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची शिवसेना घुसणार? ठाकरेंचे कार्यकर्ते ताकद बघणार; पावस गटात रंगणार तिरंगी लढत!

गावखडी पंचायत समिती गण सर्वसाधारण महिला गटाकरिता आरक्षित झाल्यामुळे या गणातून ठाकरे शिवसेनेकडून माजी सदस्यांसह दोघींची नावे आहेत, तर शिंदे शिवसेनेकडूनही दोघी इच्छुक आहेत. या गणात उमेदवार रिंगणात उतरवण्यासाठी भाजपकडून हालचाली नसल्याचे दिसते. पावस पंचायत समिती गण नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता आरक्षित असून, ठाकरे शिवसेनेकडून चौघे आणि शिंदे गटाकडून तिघे इच्छुक आहेत. भाजपकडून अद्याप कुणीही इच्छुक नाही. येथील निर्णय वरिष्ठ पातळीवरून होण्याची शक्यता आहे.

तसेच महायुती झाल्यास जिल्हा परिषद गट भाजपकडे आणि गण शिवसेनेकडे असे जागा वाटप होऊ शकते. 2017 च्या निवडणुकीमध्ये शिवसेना व भाजप हे आमनेसामने होते. त्यात गावखडी पंचायत समिती गणात भाजपचे सुशांत पाटकर विजयी झाले, तर जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या आरती तोडणकर आणि पावस पंचायत समिती गणातून कै. सुनील नावले निवडून आले होते. शिवसेनेमध्ये फूट पडल्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना निश्चित आहे.

Zilla Parishad Election
Pune Zilla Parishad election : पुण्यात खुलं मैदान; अध्यक्षपदाची स्वप्न रंगली, राजकीय 'फिल्डिंग' लागली : कोण बाजी मारणार?

FAQs :

1. पावस जिल्हा परिषद निवडणुकीत कोणते पक्ष आघाडीवर आहेत?
भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि ठाकरे गटाची शिवसेना हे तीनही पक्ष सक्रिय आहेत.

2. पावस मतदारसंघात कोणाचा प्रभाव जास्त आहे?
अल्पसंख्यांक मतदार आणि ग्रामीण मतदार ठाकरे गटाकडे झुकलेले असल्याचे सांगितले जाते.

3. युती झाल्यास परिस्थिती कशी बदलू शकते?
भाजप-शिंदे शिवसेना युती झाली तर ठाकरे गटाविरुद्ध थेट सामना होऊ शकतो.

4. तिरंगी लढत होण्याची शक्यता किती आहे?
जर युती ठरली नाही, तर तिरंगी लढत निश्चित आहे, असे स्थानिक सूत्रांचे म्हणणे आहे.

5. या निवडणुकीत निर्णायक घटक कोण ठरतील?
अल्पसंख्यांक आणि ग्रामीण मतदार हे या निवडणुकीतील निर्णायक घटक ठरण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com