Ravindra Chavan : मालवणमध्ये धाड टाकून निलेश राणेंचा स्फोटक दावा, रवींद्र चव्हाण यांच्याकडे बोट दाखवत म्हणाले, 'अशी नाटक...'

Nilesh Rane Vs Ravindra Chavan : तळकोकणात सध्या राजकीय घडामोडी वाढल्या असून आरोप-प्रत्यारोपामुळे सिंधुदुर्गचे राजकीय वातावरण तापले आहे. यातच आता मालवणमध्ये पैसे वाटपाचा आरोप केला जात आहे.
Mayor Election; Nilesh Rane And Ravindra Chavan
Mayor Election; Nilesh Rane And Ravindra Chavan sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. मालवणमध्ये निलेश राणेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर ८–१० घरांमध्ये वाटपासाठी पैसे ठेवण्याचे षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप केला.

  2. निलेश राणेंनी स्वतः एका घरावर धाड टाकून हा दावा केल्याने राजकीय वातावरण आणखी तापले आहे.

  3. भाजपने सर्व आरोप फेटाळून टाकले असून दोन पक्षांमध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे.

Sindhudurg News : तळकोकणातील मालवणमध्ये सध्या जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून येथे मुस्लिम मतदार, खोटे जात प्रमाणपत्राच्या आरोपनंतर आता शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी आणखी एक मोठा आरोप केला आहे. त्यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे नाव घेत त्यांनी पैसे वाटपाचे छडयंत्र रचल्याचा दावा केला आहे. तर हा दावा त्यांनी मालवणमध्ये एका घरावर स्वत: धाड टाकल्यानंतर केला आहे. तसेच अशाच पद्धतीने येथील ८ ते १० घरांमध्ये वाटपासाठी पैसै भाजपने ठेवल्याचा देखील आरोप निलेश राणेंनी केला आहे. मात्र हे आरोप भाजपने फेटाळले आहेत. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासात नेमक काय समोर येत याची उत्सुकता आता तळकोकणासह राज्याच्या राजकीय वर्तुळाला लागली आहे.

मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असतानाच आमदार निलेश राणे यांनी आरोपांची राळ उडवून दिली आहे. सध्या त्यांच्यात आणि भाजपचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत याांच्यात शाब्दिक वाद रंगला आहे. यातच आज त्यांनी भाजपचे पदाधिकारी बंड्या सावंत यांच्या घरावर धाड टाकल्याने खळबळ उडाली. या कारवाईत पैशांनी भरलेली बॅग सापडल्याचा दावा केला जात असून, या घटनेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

Mayor Election; Nilesh Rane And Ravindra Chavan
Nilesh Rane : कणकवलीत राणे बंधूंमध्ये सत्तासंघर्ष टोकाला! नारायण राणेंच्या 'त्या' वक्तव्यावर निलेश राणेंचा युटर्न; म्हणाले, कोठून आणलात हे शब्द?

निलेश राणे यांनी यापूर्वीच निवडणुकीत पैशांच्या गैरवापराची शक्यता वर्तवली होती. तसेच त्यांनी 'पैशांचं वाटप आहे, ते सुद्धा होऊ शकतं' असा आरोप केला होता. या धाडीनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई करत आहेत. मालवणमध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने या घटनेमुळे दोन्ही पक्षांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

यावेळी निलेश राणे यांनी, काल भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण येथे आले आणि यानंतरच येथे अशी नाटक सुरू झाली असा दावा केला आहे. तसेच त्यांनी यानंतर पोलिस प्रशासन आणि निवडणूक आयोगाच्या आधिकाऱ्यांशी बोलताना सापडलेल्या बॅगेत 25 लाखांची रोकड असून अशी बॅग फक्त येथेच नसून इतर 8 ते 10 घरांमध्ये असावी असाही आरोप केला आहे. तर ही निवडणूक कोणत्याही दबावाखाली होवू नये अशी मागणी देखील केली आहे.

तसेच कारवाई करत असताना रक्कम फक्त जप्त करणार असून त्याविरोधात केस दाखल करणार आहे की नाही, जी बॅग सापडली ती नष्ट करण्याचा प्रयत्न भाजपचे तालुकाध्यक्ष सावंत करत होते त्यांच्यावर देखील केस दाखल करणार आहात का असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना फोनवरून केला आहे. तसेच जर यांचा बंदोबस्त पोलिसांनी न केल्यास आपण स्वत: करू. त्यानंतर मग कायद्याच्या प्रश्न निर्माण झाल्यास मग मला विचारू नका, मला हे सापडल्यास त्यांचा बंदोबस्त आपण करू असू असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं जोरदार वारं वाहत आहे, येत्या दोन डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येत आहे. पण त्याआधीच आता लक्ष्मी दर्शन झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान या प्रकरणानंतर आता भाजपने यावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया देताना, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी, 'प्रदेशाध्यक्ष घरी गेले म्हणजे पैसे घेऊन गेले असं होत नाही ना? निलेश राणे यांची अपुरी माहिती असेल,' असे म्हणत बन यांनी राणेंना चुकीची माहिती मिळाल्याचे म्हटले आहे.

तसेच भाजप कधीही पैसे वाटण्याचा प्रकार करत नाही आणि हे पक्षाचे संस्कार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सध्या सिंधुदुर्गात निलेश राणे हे आमचे विरोधक म्हणूनच काम करत असून, विरोधकांनी केलेले हे आरोप बिनबुडाचे असल्याचेही नवनाथ बन यांनी म्हटले आहे.

Mayor Election; Nilesh Rane And Ravindra Chavan
Nilesh Rane : तळकोकणात युती तुटण्यामागे नेमकं कोण? भावाला सेफ करत नीलेश राणेंनी खापर फोडलं भाजपच्या बड्या नेत्यावर

FAQs :

1. निलेश राणेंनी नेमका काय आरोप केला?
त्यांनी दावा केला की भाजपने मालवणमध्ये अनेक घरांत मतदारांना देण्यासाठी पैसे ठेवले होते.

2. त्यांनी हा आरोप कसा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला?
एका घरावर स्वतः धाड टाकून त्यांनी दावा केला की येथे पैसे ठेवण्यात आले आहेत.

3. या आरोपांवर भाजपची प्रतिक्रिया काय आहे?
भाजपने हे सर्व आरोप संपूर्णपणे फेटाळले आहेत आणि त्यांना राजकीय स्टंट म्हटले आहे.

4. या घटनेचा मालवणच्या राजकारणावर काय परिणाम झाला?
आरोपांमुळे निवडणुकीचे वातावरण तणावपूर्ण झाले असून दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष वाढला आहे.

5. याआधी कोणते मुद्दे चर्चेत होते?
मुस्लिम मतदारांचे ध्रुवीकरण आणि खोटे जात प्रमाणपत्राचे आरोप हे दोन महत्त्वाचे मुद्दे आधीच चर्चेत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com