Uday Samant : ''...फक्त मंत्री सकारात्मक असून चालत नाही'' ; उदय सामंतांचं विधान!

Maharashtra Political News : रत्नागिरीतील कार्यक्रमात बोलताना विरोधकांवरही साधला निशाणा, जाणून घ्या काय म्हणाले?
Uday Samant
Uday Samant Sarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : एमआयडीसी भुखंड वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारवर मंत्री उदय सामंत यांनी केला होता. आता पुन्हा महाविकास आघाडी सरकारमधील उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना सामंत यांनी टार्गेट केले आहे. जमीन म्हणून एमआयडीसी अधिकाऱ्यांनी डोंगर विकत घेतले. मात्र, पैसे थकल्याची माहिती समोर आल्यानंतर चौकशीत ती जमीन नसून डोंगर होता आणि ज्या जमिनीची चर्चा होते आहे ती पण इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये असल्याचा दावा मंत्री सामंत यांनी केला.

रत्नागिरीमध्ये मंत्री उदय सामंत यांनी शहापूर येथील जमिनी संदर्भातील किस्सा सांगत विरोधकांवर निशाणा साधला. शिवाय यापूर्वी एमआयडीसी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कोणतेही चांगले निर्णय न घेता केवळ डोंगर दाखवून जमिनी विकण्याचेच प्रकार घडल्याचेही ते म्हणाले.

एमआयडीसी कर्मचाऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत. मात्र, ते चांगले काम करत आहेत, असे सांगत एमआयडीसी कर्मचाऱ्यांसाठी काही चांगले निर्णय मंत्री सामंत यांनी जाहीर केले. तसेच आत्ता चांगले काम करा मी माझा फोन येण्याची वेळ येऊ देऊ नका, असा सल्ला देखील सामंत यांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील 347 कर्मचाऱ्यांना उद्योग विभागाच्या आस्थापनेवरील नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम रत्नागिरी येथे मंगळवारी उद्योग मंत्री उदय सामंत(Uday Samant) यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते.

Uday Samant
Loksabha Election : ''जितके तुम्ही, तितकेच आम्ही'' ; अजित पवारांचे डावपेच वाढवणार भाजपचं 'टेन्शन'

उदय सामंत म्हणाले, ''आपण उद्योग मंत्री झाल्यावर या रखडलेला प्रश्नाला हात घातला, त्यावेळी काही अधिकाऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे पहिल्या बोर्ड मीटिंगमध्ये हा विषय होऊ शकला नाही. दुसऱ्या मीटिंगचे मिनिट्स माझ्याकडे सहीला आले त्यावेळी 88 जणांचंच आपण काम करू शकतो असं मला सांगण्यात आलं होतं.

पण आपण भूमिका घेतली काय वाटेल ते झालं तरी चालेल कॅगची चौकशी येऊ दे अन्यथा आणखी काही होऊ दे, मला तुरुंगात जावं लागलं तरी चालेल पण या 347 कर्मचाऱ्यांचा सेवेचा प्रश्न मार्गी लावून मला गरिबांना न्याय द्यायचा आहे. ही ठाम भूमिका आपण घेतली आणि मग तुषार मठकर यांच्यासारखा चांगला अधिकारी आला व हा विषय आपण मार्गी लावू शकलो.''

अधिकाऱ्यांची देखील मानसिकता लागते फक्त मंत्री सकारात्मक असून चालत नाही, असं सांगत त्यांनी मठकर यांच्या भूमिकेचे स्वागत केलं. माझ्या आयुष्याच्या पाप पुण्यामध्ये माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी गरीब लोकांना न्याय देऊ शकलो ही नोंद होईल म्हणून हा कार्यक्रम रत्नागिरीमध्ये घेण्याचा मठकर यांचा प्रस्ताव आपण लगेच मान्य केला असे यावेळी उदय सामंत म्हणाले.

याशिवाय एमआयडीसी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, कॉम्प्युटर, दुचाकीसाठी निधी मेडिक्लेम पॉलिसी असे काही महत्त्वाचे निर्णय त्यांनी यावेळी जाहीर केले. मात्र आजवर हे सगळं का होऊ शकलं नाही? असा प्रश्न उपस्थित करत यापूर्वी सगळेच फक्त जमिनी विकायच्याच व्यापात होते का असा प्रश्न पडतो, फक्त डोंगर घ्यायचे आणि जमीन म्हणून विकायचे हेच उद्योग यापूर्वी या खात्यात झाले. अशी टीका करत सामंत यांनी नाव न घेता ठाकरे गटाचे तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर निशाणा साधला.

Uday Samant
Farmers Samman Scheme News : फसलेली कर्जमाफी... न्यायालयात धाव... अन् अवमान याचिकेवर मुख्यमंत्र्यांची घोषणा

यापूर्वी काहींनी शहापूर येथे जमीन घेण्यात आली त्याचे 40 लाख रुपये थकले आहेत असा विषय माझ्यासमोर आला, थकलेले पैसे तत्काळ देण्याचे आदेश दिले पण ही जमीन इकोसेन्सिटिव्ह झोन असतानाही घेण्यात आल्याचं धक्कादायक धाडस करण्यात आलं होत. असे सांगत विरोधकांच्या कारभारावर बोट ठेवले. त्यानंतर आपण जमिनी घेतानाचे काही निकष निश्चित करत पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या जमिनी खरेदी न करण्याचा निर्णय घेतला. अशी माहिती उद्योगमंत्र्यांनी दिली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com