Udayanraje Bhosale News : 'त्या' विकृत लोकांवर कडक कारवाई करा..!

Warning that Udayanraje attacked Jitendra Awhad : प्रभू श्रीरामांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांवर उदयनराजे भोसले याची इशारा.
Udayanraje Bhosale, Jitendra Awhad
Udayanraje Bhosale, Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

Udayanraje Bhosale News : श्रीराम हे मांसाहारी होते असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांना विचारले असता ते म्हणाले, धर्म असो युगपुरुष असो ज्यांना आपण संत म्हणतो ते कधी मांसाहारी होते का, त्यांनी सगळ्याचा त्याग केलेला असतो.

श्रीरामांबाबत असे कोण म्हणत असतील तर त्यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. महापुरुषांबाबत काहीजण वैयक्तिक स्वार्थापोटी काहीही बोलत असतील तर ती एक प्रकरची विकृती असून या लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे, अशी अपेक्षा उदयनराजेंनी व्यक्त केली. सातारा (Satara) येथील जलमंदीर या निवासस्थानी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.

Udayanraje Bhosale, Jitendra Awhad
Udayanraje Bhosale News : उदयनराजेंनी केली मोदींची स्तुती; जातपातीचे राजकारण थांबले पाहिजे...

यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांविषयी केलेल्या वक्तव्यावर उदयनराजे चांगलेच संतप्त झाले. याबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले, ज्यांनी कोणी हे वक्तव्य केले आहे, त्यांनाच विचारा. उगाच यात राजकारण आणू नका. कोणतेही देव व महपुरुष असतील त्यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करण्याबाबत कडक कायदा केला पाहिजे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काहीजण वैयक्तीक स्वार्थासाठी काहीही बोलत असतील तर ती एक प्रकरची विकृती असून या लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे. मासांहारी आहेत असे युगपुरुषांविषयी असे बोलणे हे कितपत योग्य आहे. या वर उदयनराजे म्हणाले, धर्म असो युगपुरुष असो ज्यांना आपण संत म्हणतो ते कधी मांसाहारी होते का, त्यांनी सगळ्याचा त्याग केलेला असतो.

श्रीरामांबाबत असे कोण म्हणत असतील तर त्यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. त्यावर मला अधिक बोलायचे नाही. हे सर्व रबीश आहेत, अशी टीका जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर उदयनराजे भोसले यांनी केली.

(Edited by Amol Sutar)

Udayanraje Bhosale, Jitendra Awhad
Udayanraje Bhosale News : तर महाराष्ट्रात फिरायलाही पासपोर्ट लागेल..!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com