MLA Rajan Salvi Viral Photo : 'मंडपात झोप, प्रवासात जेवण'; ठाकरेंचे निष्ठावंत आमदार साळवींचे फोटो व्हायरल!

MLA Rajan Salvi Viral Photo : "बाळासाहेबांची पाठीवर थाप पडलेले शिवसैनिक त्यांच्यासोबत दोन हात करायला तयार आहेत!"
MLA Rajan Salvi Viral Photo : 'मंडपात झोप, प्रवासात जेवण'; ठाकरेंचे निष्ठावंत आमदार साळवींचे फोटो व्हायरल!
Published on
Updated on

Konkan News : दोनच दिवसांपूर्वी कोकणात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा झाला आहे. या दौऱ्यात आमदार राजन साळवी यांनी राजापूर येथे पहाटेपर्यंत सभास्थळी काम करून त्याच ठिकाणी झोपेचा चुटका काढला. तसेच, रत्नागिरीच्या दौऱ्यावरून चिपळूण येथे जात असताना जेवण्यासाठी वेळ नसल्याने गाडीतच डबा खाल्ला. आता या सगळ्याचे फोटो त्यांच्या कार्यकर्त्यांनी फेसबुकवरती पोस्ट लिहून व्हायरल केले आहेत. (MLA Rajan Salvi Viral Photo News)

MLA Rajan Salvi Viral Photo : 'मंडपात झोप, प्रवासात जेवण'; ठाकरेंचे निष्ठावंत आमदार साळवींचे फोटो व्हायरल!
NCP Crisis : राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह अजित पवारांकडे; आता आमदार दिलीप मोहितेंनी केला मोठा दावा

"दिवंगत बाळासाहेब ठाकरे स्वाभिमानी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळावर शिवसेना संघटना उभी केली. कितीही मोठे संकट आले तरी त्याच्यासोबत दोन हात करण्याची, फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून अवकाशात झेप घेण्याची ताकद प्रत्येक कार्यकर्त्याला बाळासाहेबांनी दिली.

सध्याच्या महाराष्ट्रातील राजकारणाकडे पाहिले तर तीच परिस्थिती आहे. पण, बाळासाहेबांच्या रक्तासोबत गद्दारी करून गुजराती बोक्यांसोबत संधान मांडू पाहणाऱ्या लाचारांना हे माहीत नाही की, बाळासाहेबांची पाठीवर थाप पडलेले शिवसैनिक त्यांच्यासोबत दोन हात करायला तयार आहेत," असेही या कार्यकर्त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हा जो फोटो आहे, तो शिवसेनेच्या प्रत्येक नेत्याने आणि शिवसैनिकाने आठवणीत ठेवावा असा आहे. कारण हा फोटो निष्ठावंत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीचा आहे.

पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या राजापूर येथील जनसंवाद दौऱ्यानिमित्त जवाहर चौक येथे पहाटे 4 वाजेर्यंत काम करून थकून सोफ्यावर चुटकीसरशी झोप घेणारा, हा शिवसैनिक दुसरा तिसरा कोणीही नसून महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे सलग तिसरी वेळ असलेले सदस्य, शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी आहेत.

त्यांच्यासोबत जी व्यक्ती आहे, ते शिवसैनिक प्रफुल्ल लांजेकर आहेत. पहाटेपर्यंत काम करून पुन्हा ही माणसं पक्षप्रमुखांच्या दौऱ्याला सकाळी 7 वाजता हजर होती, अशी माहिती फेसबुकवरील या पोस्टमध्ये कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आहे.

कितीही संकटे आली तरी महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या शिवसेनेत जोपर्यंत असे शिवसैनिक आहेत. तोपर्यंत शिवसेना राखेतून भरारी घेणारच, असेही थेट आव्हान आमदार राजेश साळवे यांच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे. (Latest Political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा चालू असताना पक्षप्रमुख आपल्या घरी येणार म्हटल्यावर शिवसैनिकाची मोठी लगबग असते. तशीच काहीशी शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांची झाली.

शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी पक्षप्रमुख व वहिनी यांच्या पाहुणचारात एवढे दंग झाले की, त्यांना आपल्या जेवणाचे भानही राहिले नाही.

ते लगबगीने चिपळूणसाठी निघत असताना त्यांची होणारी सून ऋता हिने जेवणाचा डबा गाडीत दिला. आमदार राजन साळवी यांनी तो रत्नागिरी ते चिपळूण प्रवासादरम्यान खाल्ला, अशीही माहिती दुसऱ्या पोस्टमध्ये देण्यात आली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com