MLA Vaibhav Naik News : ठाकरेंचे निष्ठावान आमदार नाईक अन् भाजप मंत्र्यांची गुप्त भेट; चर्चांना एकच उधाण!

Konkan Political News : वैभव नाईक शिंदे गटात जाणार का?
MLA Vaibhav Naik News
MLA Vaibhav Naik News Sarkarnama
Published on
Updated on

Konkan News : कोकणात उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर आता मोठा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता असून, ठाकरे गटाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी भाजपचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर शिवसेना नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांतच ठाकरे यांच्या व्यासपीठावरील लोकप्रतिनिधी आमच्याकडे येतील, असं मोठे विधान केलं होतं. (Latest Marathi News)

सिंधुदुर्गातल्या राजकारणातील मोठी घडामोड घडली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार वैभव नाईक यांची गुप्त भेट झाली. त्यामुळे सिंधुदुर्गामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी आज सार्वजनिक बांधकाममंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची कणकवली शासकीय विश्राम गृहातील एका खोलीत अचानक गुपचूप भेट घेतली आहे.

या भेटीच्या वृत्ताने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. वैभव नाईक हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या अधून मधून बातम्या येत असतात. मात्र, आज अचानक वैभव नाईक यांनी भाजपच्या रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन सर्वांनाच धक्का दिला आहे. या भेटीचा तपशील समजला नसून वैभव नाईक यांनी भेट घेतल्याचे मान्य केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Vaibhav Naik News
NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचा निकाल काय? घटनातज्ज्ञ म्हणतात...

या भेटीमुळे आता वैभव नाईक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार का? या शक्यतेभोवती चर्चा फिरत आहे. कारण, वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्यामागे एसीबीची कारवाईचे शुक्लकाष्ठ लागले आहे. शिवसेनेतल्या फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत राहिलेले आमदार वैभव नाईक यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अनेकदा अँटी करप्शन ब्युरो (ACB Action) म्हणजचे एसीबीची नोटीस आली आहे. तर अनेकदा ते भाजप (BJP) नेत्यांच्या आणि राणे कुटुंबीयांच्या (Rane Family) निशाण्यावर असतात.

ठाकरे कुटुंबाशी निष्ठा -

शिवसेनेच्या फुटीनंतर आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी ठाकरे कुटुंबाशी निष्ठा राखली. नाईक यांच्यावर एसीबी कारवाईचे टांगती तलवार असले तरी त्यांनी ठाकरेंची साथ सोडणार नाही, असे सांगितले होते. आपण शेवटपर्यंत ठाकरेंसोबत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे आता आजच्या भेटीनंतर त्यांची कोणतीही प्रतक्रिया आली नाही, मात्र या भेटीबाबत आता चर्चांना उधाण आले आहे.

R

MLA Vaibhav Naik News
NCP Crisis News : "नार्वेकर दामशास्त्री, हा किरकोळ निर्णय, चुलीत...", संजय राऊत संतापले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com