Karnataka Assembly Election : महाराष्ट्र एकीकरण समिती सहा मतदारसंघात निवडणूक लढवणार : बेळगावमधील बैठकीत निर्णय

माजी आमदार मनोहर किणेकर यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकावीच लागेल. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे सांगितले.
Maharashtra Integration Committee Meeting
Maharashtra Integration Committee MeetingSarkarnama
Published on
Updated on

बेळगाव : कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्याचे सर्वाधिकार घटक समितीला देण्यात आले आहेत. तसेच, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून सहा मतदारसंघातून उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी मराठी भाषिकांनी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आले आहे. (Maharashtra Integration Committee will contest elections from six constituencies)

विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मराठा मंदिर येथे झाली. त्यात मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी घटक समितीने आपले उमेदवार निश्चित करावेत. घटक समितीने दिलेल्या उमेदवारांच्या पाठीशी मध्यवर्ती समिती भक्कमपणे उभे राहील. गेल्या ६६ वर्षांपासून आपण लढत आहोत, याची संपूर्ण देशाला जाणीव आहे. त्यामुळे कोणतीही निवडणूक लढ्याचा भाग म्हणून आपण लढत असतो.

Maharashtra Integration Committee Meeting
B. S. Yediyurappa News : येडियुरप्पांचा ‘यु टर्न’ : सिद्धरामय्यांच्या विरोधात मुलगा विजयेंद्र लढणार नसल्याची केली घोषणा

यावेळी बेळगाव दक्षिण, उत्तर व खानापूर मतदार संघात समितीचा उमेदवार विजयी व्हावा, यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारे गाफील राहू नये. यावेळी जिंकणारच या उद्देशाने आपण निवडणुकीत रिंगणात उतरले पाहिजे. घटक समितीने लवकर बैठका घेऊन आपले उमेदवार जाहीर करावेत असे मत व्यक्त केले.

माजी आमदार मनोहर किणेकर यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकावीच लागेल. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे. समितीचा आमदार नसल्यामुळे मराठी भाषिकांना किती त्रास होतो, त्याची जाणीव सर्वांना आहे, असे सांगितले.

Maharashtra Integration Committee Meeting
Sandipan Thorat Passed Away : पंढरपुरातून सात वेळा लोकसभेवर निवडून आलेले काँग्रेसचे माजी खासदार संदीपान थोरात यांचे निधन

खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे यांनी खानापूर तालुका समिती कशाप्रकारे निवडणूक प्रक्रिया राबवित आहे. याची माहिती दिली. ॲड राजाभाऊ पाटील, रणजीत चव्हाण पाटील, निपाणी विभाग समितीचे अध्यक्ष जयराम मिरजकर, बी. डी. मोहनगेकर, ॲड. एम. जी. पाटील, बी. एस. पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. विकास कलघटगी, बी. ओ. येतोजी, नानू पाटील, सुरेश राजुकर, एस. एल. चौगुले, रावजी पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

Maharashtra Integration Committee Meeting
Karnataka Election: भाजपने खेळला मोठा डाव; निवडणूक जाहीर होण्याच्या काही तास आधी काँग्रेस मुख्यमंत्र्यांबाबत घेतला हा निर्णय..

समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अजित पवारांची भेट

मध्यवर्ती महाराष्ट्र समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी वेळोवेळी पुढे जात असल्याने तीन सदस्य खंडपीठात महाराष्ट्र किंवा कर्नाटकाचे न्यायमूर्ती असू नयेत, यासाठी महाराष्ट्र सरकारने लवकर न्यायालयात अर्ज दाखल करावा. तसेच, महाराष्ट्र सरकारने सीमाभागासाठी लागू केलेल्या योजनांचा लाभ मराठी भाषिकांना मिळावा, यासाठी लवकर पावले उचलावीत, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. या वेळी पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून समस्या सोडविल्या जातील, आश्वासन दिले आहे.

Maharashtra Integration Committee Meeting
BJP News : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांविरोधात युडियुरप्पांचा मुलगा उतरणार मैदानात : माजी मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबतच मध्यवर्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशीही चर्चा केली. या वेळी त्यांनी पाच किंवा सहा एप्रिल रोजी मुंबई येथे या सर्व विषयांवर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती दिली. तसेच, सीमावासियांसाठी लवकरच चंदगड परिसरात कार्यालय सुरू केले जाणार आहे, अशी माहिती पाटील यांनी मध्यवर्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचे खजिनदार मरगाळे यांनी बैठकीत सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com