BJP Vs MNS: लोकसभेच्या निकालापूर्वीच मनसेनं भाजपवर टाकला डाव; कोकणाच्या लाल मातीत रंगणार 'कुस्ती'

Konkan Graduate Constituency Panse Vs Davkhare: पानसेंची उमेदवारी जाहीर करुन मनसेने भाजपच्या गोटात काय सुरु आहे, याची चाचपणी करण्यास सुरवात केली आहे. मनसेची ही खेळी असल्याचे बोलले जाते.
Konkan Graduate Constituency Panse Vs Davkhare
Konkan Graduate Constituency Panse Vs DavkhareSarkarnama
Published on
Updated on

Konkan Politics, 29 May: लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच महायुतीचे घटक पक्ष असलेले मनसे आणि भाजपमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघावरुन (Konkan Graduate Constituency 2024) जुंपली आहे. या मतदारसंघातून कोण लढणार याबाबत मनसे आणि भाजपने आपले उमेदवार उतरवण्याची घोषणा केली. त्यांच्या नावाची औपचारीक घोषणाही केली आहे.

भाजपच्या तिकिटावर निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) हे कोकण पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेवर आमदार आहेत. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली, तरी तिसऱ्या टर्मसाठी त्यांचं नाव निश्चित मानलं जात होतं. अशातच भाजपच्या बालेकिल्ल्यात मनसेने उमेदवार उतरवण्याची घोषणा करुन या जागेवर दावा ठोकला आहे. अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांच्या नावाची घोषणा मनसे केली आहे.

Konkan Graduate Constituency Panse Vs Davkhare
Chhagan Bhujbal News: भुजबळांच्या विधानात चुकीचं काय? राष्ट्रवादीच्या नेत्यानं घेतला राणेंचा समाचार

राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठींबा दिला, मग कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक महायुतीमधील घटक पक्ष मनसेच्या उमेदवाराला जाहीर पाठींबा देणार कां, असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांना केला असता त्यांनी उत्तर दिले की तो त्यांचा तत्वाचा विषय आहॆ, त्याबद्दल आम्ही काय बोलणार, असे सांगत त्यांनी विषय टाळला.

आम्ही अगदी योग्य उमेदवार दिला आहे.अभिजीत पानसे यांचे वडील रमेश पानसे शिक्षण तज्ज्ञ आहेत आणि अनुताई वाघ त्यांच्याबरोबर कामही केले आहे. त्या क्षेत्रातील नॉलेज असलेला खमका उमेदवार राज साहेबांनी दिला आहे. महायुतीचा विषय इथे राहतो कुठे तुमच्या पक्षाने त्याना जाहीर केल आहे, राज साहेब आणि इतर पक्षातील वरिष्ठ मंडळी बघून घेतील. आम्ही आतापर्यंत तरी एकटेच लढलो आहोत, असे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.

मनसेची खेळी

पानसेंची उमेदवारी जाहीर करुन मनसेने भाजपच्या गोटात काय सुरु आहे, याची चाचपणी करण्यास सुरवात केली आहे. लोकसभेला बिनशर्त पाठींबा दिल्यानंतर मनसेला आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका लढवायच्या आहेत. त्यासाठी मनसेची ही खेळी असल्याचे बोलले जाते. भाजप नेते, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही मनसेच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे आगामी काळात कोकण पदवीधर मतदारसंघावरुन मनसे आणि भाजप नेते आमने-सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही. महायुतीत सारं आलबेल नसल्याचं चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com