Raj Thackeray Statement: 'मला तडजोड करावी लागली तर...' राज ठाकरेंचे मोठे विधान

Konkan News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत.
Raj Thackeray News
Raj Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray Konkan Tour News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, राज ठाकरे यांनी राज्यातील बदललेल्या राजकारणावर आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान केले. तसेच त्यांची राजकीय दिशा काय असेल याचेही सूतोवाच केले आहेत.

राज ठाकरे आज ( ता. १३ जुलै) रत्नागिरीतील चिपळून येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, '' आपला विचार आपण लोकांपर्यंत का पोहचवायचे म्हणत आहोत. पदाधिकाऱ्यांनी एकमेकांशी बोलताना पदानुसार न बोलता मनाने बोलणे गरजेचे आहे. आज चिपळूणमध्ये शाखेचे उद्घाटन झाले आहे. इथे अविनाश जाधव, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई ही सगळी मंडळी येऊन गेली आहे. जोरदार कामाला सुरुवात झाली.

Raj Thackeray News
Coal Mining Allocation Fraud : माजी खासदार विजय दर्डांना धक्का; कोळसा खाणवाटप गैरव्यवहारात 6 जण दोषी : 18 जुलैला सुनावणार शिक्षा

एखाद्या पदावर बसल्यानंतर काम झाले पाहिजे. पक्ष सांगेल ते काम करावे, अन्यथा पदावर राहता येणार नाही. मला तडजोड करावी लागली, तर मी घरात बसेन, पण तडजोड करणार नाही. राज्यात जो काही व्यभिचार सुरू आहे, तो मी करणार नाही, असे महत्त्वाचे विधान राज ठाकरे यांनी केले आहे.

लोकसभेची निवडणूक का लढवायची असा सवालही यावेळी पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी केला. सद्यपरिस्थितीवर बोलताना ते म्हणाले, मी पुढील १५ दिवसात मेळावा घेणार आहे. त्या मेळाव्यात सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करेन. मेळाव्याच्या माध्यमातून माझ्या मनातील संताप बाहेर काढणार असल्याचेही ठाकरे यांनी सांगितेल.

Raj Thackeray News
Co-Ordinating Committee: मोठी बातमी! महायुतीत समन्वयासाठी समिती स्थापन; 'या' नेत्यांवर जबाबदारी

दरम्यान, हव्यासापोटी राजकारण अस्थिर... अस्थिरतेमुळे उद्योगविश्वात अविश्वास... विद्वेषामुळे समाज अस्वस्थ... अत्याचारामुळे महिला असुरक्षित... बेरोजगारीमुळे तरुणाई खचलेली... महागाईमुळे कुटुंब त्रस्त... प्रश्नांचा पाढा वाचावा तितका कमीच... महाराष्ट्र चौफेर खदखदतोय पण याच ज्वलंत प्रश्नांवर मतदारराजा मतदान करेल कि पुन्हा खोट्या अस्मितेच्या लाटेवर स्वार होईल... तुम्हाला काय वाटते? अशा शब्दांत मनसेने राज्यातील सध्याच्या राजकारणावर टीका केली.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com