Co-Ordinating Committee: मोठी बातमी! महायुतीत समन्वयासाठी समिती स्थापन; 'या' नेत्यांवर जबाबदारी

Maharashtra Politics: या समन्वय समितीत तिन्ही पक्षातील प्रत्येकी चार जणांचा सहभाग असणार
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Political News: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) सामिल झाल्यामुळे आता तीन पक्षाचे सरकार सत्तेत आहे. या महायुतीच्या सरकारमध्ये समन्वय साधण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) असे तीन पक्षाचे सरकार सत्तेत असल्यामुळे अंतर्गत वादविवाद होऊ नये, तसेच या तिनही पक्षांमध्ये समन्वय राहण्यासाठी या समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील प्रत्येकी चार सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Maharashtra Cabinet Expansion : मंत्री तर झालात, पण खातं कोणतं मिळणार? धनंजय मुंडे म्हणाले..

या समितीमध्ये एकूण 12 सदस्य काम पाहणार आहेत. या समितीत समन्वय साधण्याचे काम भाजपाचे नेते प्रसाद लाड करणार आहेत. भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड आणि आशिष शेलार यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे.

शिवसेनेकडून उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे, राहुल शेवाळे यांचा या समितीत सहभाग असणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) समितीवर सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि धनंजय मुंडे यांचा समावेश करण्यात आला आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Maharashtra Politic's : अमित शहांच्या भेटीनंतर खाते वाटपावर तोडगा....अजित पवार गटाला अर्थ व सहकार मंत्रिपद?

दरम्यान, सध्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. तर राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन आठवडा उलटला तरी देखील अध्याप खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे खाते वाटप कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com