Raj Thackeray: शरद पवारांनी राजीनामा दिला तेव्हा अजित पवारांना आतून उकळ्या फुटत होत्या; राज ठाकरेंचा टोला

Raj Thackeray on Ajit Pawar : "अजित पवार ज्या पद्धतीने अरेरावी करत होते ते पाहून पवार साहेबांच्या मनात विचार आला असणार की..."
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

MNS News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज रत्नागिरीमध्ये सभा पार पडत आहे. यावेळी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकारणातून पायउतार होण्याच्या निर्णयावरून विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

राज ठाकरे म्हणाले, "मी राज्यात सगळीकडेच सभा घेणार आहे. पण आज पहिली सभा रत्नागिरी घेत आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. नाल्या खूप दिवसांपासून तुंबल्या आहेत. त्यामुळे तुंबलेली नाले सफाई करणं गरजेचं आहे. आता दुसरीकडे राजीनाम्याचा विषय सुरू होता तो संपला".

Raj Thackeray
Sushma Andhare on Barsu : बारसूतील परप्रांतियांच्या जमिनींच्या व्यावहाराबाबत बोला; सुषमा अंधारेंचे सोमयांना आव्हान

"मला वाटतं की त्यांना (शरद पवार यांना) राजीनामा द्यायचा होता. पण ज्यावेळी राजीनामा द्यायचं जाहिर केलं त्यावेळी अजित पवार कसे बोलत होते? ज्या पद्धतीने अजित पवार बोलत होते ते पाहून शरद पवारांनी राजीमाना माघे घेतला असावा".

"अजित पवार ज्या पद्धतीने अरेरावी करत होते ते पाहून पवार साहेबांच्या मनात विचार आला असणार की राजीनामा दिल्या दिल्याची घोषणा केली तर हा इतका उर्मट वागतोय तर खरंच राजीनामा दिला तर कसा वागेल, म्हणून राजीनामा मागे घेतला असणार", असा टोला राज ठाकरे यांनी अजित पवार यांना लगावला.

Raj Thackeray
Deputy Chief Minister : उपमुख्यमंत्र्यांचे देवगिरीतील कार्यालय सुरू, मानद सचिव संदीप जोशींनी सांभाळले काम !

"कोकणात अजून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पण ते प्रलंबित पाहण्याची कारणं हे तुम्ही आहात. कारण त्याच-त्याच पक्षाला निवडून देऊन पक्षाचा व्यापार करून ठेवला आहे. राज्य सरकारमध्येही अशा प्रतिनिधींनाही किंमत नाही.

मी ज्यावेळी याआधी कोकणात आलो, त्यावेळी पाहिलं 2007 साली गोवा-मंबुई महामार्गाचं काम सुरू होतं. ते काम अजून पूर्ण झालेलं नाही. तुम्हीही त्याच-त्याच लोकांना निवडून देत आहात, त्यामुळे तेही काम करत नाहीत", असं ते म्हणाले.

Raj Thackeray
Chandrapur BJP : काॅंग्रेसनंतर भाजपमध्येही बदलचे वारे, भोंगळे, डॉ. गुलवाडेंचे अध्यक्षपद अधांतरी !

"मी मागच्या वेळी आलो, त्यावेळी गोवा-मुंबई महामार्गाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे मी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. त्यावेळी ते म्हणाले, जरा नितीन गडकरी यांच्याशी बोला, मी त्यांच्याशी बोललो. तर ते म्हणाले की, अहो ते कॉन्ट्रॅक्टर पळून गेले.

मग एकातरी तुमच्या आमदारांने विचारलं का? की ही कॉन्ट्रॅक्टर पळून गेले आहेत. पण काय आहे ना ते तुम्हाला गृहित धरतच नाही. प्रकल्प नाणार ला होणार की बारसूला होणार? यावरून आम्ही भांडतो आहोत. पण तुमच्या पायाखालून जमीन निघून जाते ते तुम्हाला कळत देखील नाही", असंही ते यावेळी म्हणाले.

(Edited by - Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com