Sushma Andhare on Barsu : बारसूतील परप्रांतियांच्या जमिनींच्या व्यावहाराबाबत बोला; सुषमा अंधारेंचे सोमय्यांना आव्हान

Narayan Rane : राणे 'सांगितल्या चाकरीचे अन् दिल्या भाकरीचे' असे चोख काम करतात
Sushma Andhare
Sushma AndhareSarkarnama

Uddhav Thackeray in Mahad : कोकणात मच्छिमारी करणाऱ्यांची कदम, सावंत, जाधव अशी अडनावे आहेत. मात्र झव्हेरी, शर्मा, मेहता, गुप्ता अशी अडनावे कधीपासून आली. रिफायनमुळे येथील जमिनी दलालांनी परप्रातिंयाना काही लाखांत विकाल्या. आता त्या जमिनींना कोट्यवधींचा भाव आला आहे. गुप्ता नावाच्या अधिकाऱ्याची येथे ९२ एकर जमीन आहे. अशिष देशमुख यांची १८ एकर जमीन आहे. या परिसरात जमीन व्यावहराता मोठा घोटाळा झाला आहे. याकडे भाजप नेते किरीट सोमय्यांनी लक्ष द्यावे, असे खुले आव्हान शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिले आहे.

Sushma Andhare
Chandrapur BJP : काॅंग्रेसनंतर भाजपमध्येही बदलचे वारे, भोंगळे, डॉ. गुलवाडेंचे अध्यक्षपद अधांतरी !

अंधारे म्हणाल्या, "आमचे हिंदुत्व दंगली पेटवून लोकांचे घरे उजाडणारे नाही तर चुली पेटविणारे हिंदुत्व आहे. बारसू परिसरातील (Barsu) अनेक परप्रातियांच्या जमिनी आहेत, हे स्पष्ट झाले आहे. येथील लोकांच्या जमिनी दलालांनी कवडीमोल दरात परप्रांतियांना विकल्या आहेत. त्यामुळे येथील जमिनींचे व्यावहार कसे झाले याकेड किरीट सोमय्यांनी लक्ष द्यावे. त्यांनी जुनी प्रकरणे उकरून काढत बसू नये. आता त्यांनी बारसू परिसरातील जमिनी कुणाला कशा विकल्या याबाबत माहिती घ्यावी. येथे घोटाळ्यांचा मोठा डेपोच आहे."

Sushma Andhare
Sharad Pawar : मी खूप भाग्यवान; शरद पवार असं का म्हणाले ?

अंधारे (Sushma Andhare) यांनी यावेळी राज्य सरकार १४ टक्क्यांचे असल्याची टीका केली. आंधारे म्हणाल्या, "महाविकास आघाडी सरकारने महाडमध्ये ट्रामा केअर सेंटर, बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारले. माजी आमदार माणिक जगताप यांनी महापालिकेची इमारत उभ्यारण्यात योगदार दिले. कोरोना आणि पूरस्थितीत स्नेहल जगतापांनी मोठे काम केले. मात्र सध्याचे राज्य सरकार एमआयडीसीतील भंगार विकून खात आहेत. विविध कामांसाठी १४ टक्के कमिशन घेत आहे. रायगडावरील हिरकणी बोगद्यासाठी २१ कोटी जाहीर करूनही २१ पैसेही खर्च केला नाही."

Sushma Andhare
Sharad Pawar : अजित पवारांबाबत गैरसमज पसरविले जातात; पवारांकडून पाठराखण

यावेळी अंधारे यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. आंधारे म्हणाल्या, "कर्नाटकात सध्या बंजरंगबलीचे नाव घेत राजकारण सुरू झाले आहे. ज्या वेळेस विकासाचे मुद्दे नसतात त्यावेळी भाजप महापुरुष, देवदेवांच्या मागे लपते. तेच कर्नाटकात भाजपने सुरू केले आहे." राणे पितापुत्रांना गंभीरपणे घ्यायचे नसते अशी टीकाही त्यांनी केली. त्या म्हणाल्या, मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांच्या मुलांना जाहीरपणे उत्तर देण्याची गरज नाही. त्यांना गंभिरपणे घ्यायचे नाही. ते 'सांगितल्या चाकीरीचे आणि दिल्या भाकरीचे' असे त्यांची कामे आहेत. ते काम त्यांचे चोखपणे पार पाडत आहे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com