स्वतःच्या सावलीलाही भिणारे म्हणतात ‘सुनील तटकरे थापेबाज’ : रविशेठ पाटलांना टोला

खासदार सुनील तटकरे यांचे भाजप आमदार रविशेठ पाटलांच्या टीकेला उत्तर
Sunil Tatkare
Sunil Tatkaresarkarnama
Published on
Updated on

पेण : स्वतःच्या सावलीला भिणारी माणसं झोपेतून उठून सुनील तटकरे (Sunil Tatkare) थापेबाज आहेत, अशी टीका टिप्पणी करतात. त्यांना माझ्यावर टीका करू द्या. आपण आपले काम करत राहू, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी पेणचे भाजप आमदार रविशेठ पाटील (Ravi Seth Patil) यांना प्रत्युत्तर दिले. (MP Sunil Tatkare answered to BJP MLA Ravi Sheth Patil's criticism)

पेण शहरात राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात तटकरे बोलत होते. दोन दिवसांपूर्वी बोलताना आमदार पाटील यांनी खासदार तटकरे यांच्या भूलथापांना बळी पडू नका, अशी टीका केली होती. त्याला तटकरे यांनी आज (ता. ८ जानेवारी) उत्तर दिले. तटकरे म्हणाले की, थापेबाज सुनील तटकरे यांचं काय ऐकता, असे माझ्याबाबत म्हटलं गेलं आहे. मी जर थापेबाजी करणारा असतो, तर पाच वेळा विधानसभेला निवडून आलो नसतो. मी जर दिशाभूल केली असती तर मोदी नावाची त्सुनामी लाट संपूर्ण देशात निसर्ग चक्री वादळापेक्षा जास्त वेगाने आलेली असताना रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात लोकांनी मला खासदार म्हणून ४० हजारांपेक्षा जादा मताधिक्क्यांनी निवडून दिलं नसतं.

Sunil Tatkare
जिकडे विनय कोरे तिकडे अध्यक्षपदाचा गुलाल!

अलीकडच्या कालावधीत काय झालं आहे, की सुस्त झालेल्या माणसांना मी एखाद्या तालुक्यात गेल्यानंतर जाग येते. मग झोपतून जागे होऊन त्याठिकाणी ते जातात आणि या प्रश्नाची उकल करू, त्या प्रश्नाची उकल करू, असे सांगतात. पण, भ्रष्टाचारालाच आयुष्य समजणारे समाजाचे प्रश्न कसे सोडविणार, असा बोचरा सवालही तटकरेंनी या वेळी केला.

Sunil Tatkare
खासदार निंबाळकरांनी ऑनलाईन बैठकीचा उल्लेख केला भेंडीबाजार...!

एखाद्या प्रश्नाची जाण, गांभीर्य तसेच अधिकारी वर्ग आणि राज्य सरकारकडून तो सोडवून घेण्याचा गेल्या २५ ते ३० वर्षांचा अनुभव असल्यामुळे आपण त्याच पद्धतीने काम करत राहणार आहोत. टीका करणाऱ्यांना टीका करू द्यावी. त्यांनी माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांचं वर्तमानपत्रात नाव तर कोण छापणार, असा चिमटाही तटकरे यांनी पाटील यांना घेतला.

Sunil Tatkare
कलेक्टरकडे माईक सरकावत भरणेंनी केली प्रणिती शिंदेंच्या प्रश्नातून स्वतःची सुटका!

माझ्यावर टीका करण्याचे काम त्यांना करू द्यावे. आपण नियमितपणे जनतेची सेवा करण्यासाठी, तसेच पेणच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबद्ध आहोत. आगामी काळात पेणच्या विकासाचा निग्रहपणे प्रयत्न करत राहू. पेण परिसराचा चेहरामोहा बदलण्याचे काम करत राहू आणि त्यासाठी तुम्हा सर्वांच्या मदतीची अपेक्षा आहे, असेही तटकरे या वेळी बोलताना म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com