
Ratnagiri News : जल जीवन मिशन (Jal Jeevan Mission) योजनेअंतर्गत झालेल्या कामांविषयी नागरिक आणि स्थानिक प्रतिनिधींनी अनेकदा तक्रारीचा पाढाच वाचला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दापोली पंचायत समितीत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी, जलजीवन मिशनच्या कामावर नाराजी व्यक्त करताना अधिकाऱ्यांना फटकारले. तसेच एकाच ठेकेदाराला काही योजनांची कामे देण्यात आल्यावर कामास दिरंगाई होत असल्याचा आरोप केला. तसेच कामात दिरंगाई करणाऱ्या त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा असे थेट निर्देशच तटकरेंनी यावेळी दिले. यामुळे जिल्ह्यातील ठेकेदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
यावेळी बैठकीला दापोली प्रांताधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर, रमा बेलोसे, नेहा जाधव, दापोलीच्या नगरसेविका साधना बोत्रे आदी प्रशासकीय खात्यांचे कर्मचारी उपस्थित होते.
जलजीवनच्या पाणीपुरवठा योजनेत एकाच ठेकेदाराला काही योजनांची कामे देण्यात आल्याने कामांना पूर्ण होत्यात विलंब होत आहे. यामुळे पिण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे स्थानिक आणि पदाधिकाऱ्यांना याबाबत थेट खा. सुनिल तटकरे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. ज्याची दखल घेत तटकरेंनी दापोली पंचायत समितीमध्ये बैठक लावली. यावेळी आढावा घेताना त्यांनी कामांवर आणि अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच कामात कुचराईबाबत संबंधित अधिकाऱ्यांनाही फटकारले. तर त्या संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, असे थेट निर्देश जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले.
तालुक्यात अनेक ठिकाणी घरोघरी नळ या उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन या योजनेच्या माध्यमातून पाणीयोजनांची कामं सुरू आहेत. मात्र काही गावांमधील योजना रखडल्या आहेत. एकाच ठेकेदाराला काही गावांमधील जलजीवन मिशन या नळपाणी योजनेची कामं देण्यात आली आहेत. त्यामुळेच योजना रखडल्या आहेत, अशी माहिती या बैठकीतून पुढे आली. या वेळी अनेकांनी तक्रारी केल्या. या सगळ्याची गंभीर दखल घेत खासदार सुनील तटकरे यांनी घेतली असून, संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावे, असे निर्देश थेट बैठकीतून जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना फोन लावत दिले.
दापोली शहरातील पाण्याचाही प्रश्न या वेळी समोर आला होता. नगरसेविका साधना बोत्रे यांनी हा विषय या बैठकीत मांडला. यावरून मुख्याधिकारी यांनीही प्रशासनाकडून पाण्याचे नियोजन सुरू असून, वेळप्रसंगी टँकरची तयारी ठेवल्याची माहिती दिलीय.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.