Vinayak Raut Slams Uday Samant : उदय सामंत दळभद्री ; खासदार राऊतांची जहरी टीका

Maharashtra Politics : जाती धर्मामध्ये आग लावण्याचे काम सध्या सुरू आहे.
Uday Samant , Vinayak Raut
Uday Samant , Vinayak Raut sarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri : रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी जहरी टीका केली आहे. राऊतांनी उदय सामंत यांचा उल्लेख दळभद्री असा केला. जाती धर्मामध्ये आग लावण्याचे काम सध्या सुरू असल्याचाही आरोप करीत त्यांनी भाजपा आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली.

Uday Samant , Vinayak Raut
Kumar Saptarshi PIL Filed ON Bhide : भिडेंच्या अडचणीत वाढ ; कुमार सप्तर्षीं यांच्याकडून जनहित याचिका दाखल

"भाजपमध्ये निष्ठावंत संपवले जात असून बाहेरचे हुजरे पक्षात घेतले जात आहेत. तुमच्यात धमक आहे तर बाहेरचे न घेता पक्ष वाढवून दाखवा. 'कार्यकर्ते द्या,' म्हणून भाजपाला भीक मागावी लागते. ज्यावेळी रिफायनरी पाकिस्तानमध्ये गेली तेव्हा विश्वगुरू काय करत होते, असा प्रश्नही राऊतांनी उपस्थित केला. 'काहीही झालं तरी राजापूरचे आमदार राजन साळवी हेच असतील,; असे राऊत म्हणाले.

Uday Samant , Vinayak Raut
Beed Aurangzeb Status : औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याने बीडमध्ये तणाव ; दोन गटांत दगडफेक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेल्या शहाच्या त्रासाने कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला. नितीन देसाई यांनी उभा केलेला स्टुडिओ कधीच घशात घालू देणार नाही,असा इशारा त्यांनी दिला. "देवेंद्र फडणवीस बोलत असताना पालकमंत्री उदय सामंत टाळ्या वाजवत बसतात. सामंत यांना काही कामच राहिलेले नाही. गद्दारीचा वचपा काढावा लागेल, त्यासाठी रत्नागिरीमध्ये एकजूट हवी," असे राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com