Beed Aurangzeb Status : औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याने बीडमध्ये तणाव ; दोन गटांत दगडफेक

Beed Crime News : . व्हिडिओमध्ये दोन गटाचा मोठा जमाव जमल्याचं दिसते.
 Beed Crime News
Beed Crime NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed News : औरंगजेबाचा फोटो आणि मजकुरावरून बीडच्या केज तालुक्यात दोन गटांत हाणामारी आणि दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. आडस गावात रविवारी रात्री हा प्रकार झाला. या हाणामारी आणि दगडफेकीचा व्हिडिओ समोर आला आहे. कोल्हापूर, अहमदनगरनंतर औरंगजेबाचे फोटो प्रकरण बीड जिल्ह्यात पोहोचल्याने पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे.

बीडच्या धारूर पोलिसांनी याप्रकरणी सुमारे सोळा जणांना अटक केली असून २१ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. व्हिडिओमध्ये दोन गटांचा मोठा जमाव जमल्याचं दिसते. वाद होऊन हा जमाव समोरासमोर भिडल्याचे दिसते.

 Beed Crime News
Amit Shah on Ajit Pawar : अजितदादा, बऱ्याच काळानंतर तुम्ही योग्य जागी बसलात ; शहा यांचे मोठे विधान

आडस गावातील अरबाज शेख नावाच्या तरुणाने औरंगजेबाच्या फोटोसह 'किंग' असे लिहिलं होतं. त्यानंतर त्यावर "ज्यांची बरोबरी केली जात नाही, त्यांची बदनामी केली जाते." असा मजकूर लिहित व्हाट्सअप स्टेटस ठेवलं होतं. हे स्टेटस दुसऱ्या गटातील तरुणांनी पाहिल्यानंतर याचा जाब विचारण्यासाठी संबधीत तरुणाकडे गेले होते. त्यानंतर दोन गटात हाणामारी आणि दगडफेक झाली.

 Beed Crime News
Eknath Shinde ON Amit Shah : सहकार क्षेत्रासाठी शाहचं नेतृत्व म्हणजे वरदान ; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेने आजही (सोमवारी) आडस गावामध्ये तणावाचे वातावरण आहे. बीडच्या धारूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सोळा आरोपींना अटक केली आहे. यातील पाच संशयीत आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गेल्या महिन्यात इन्स्टाग्रामवर औरंगजेबचा फोटो टाकून “बाप तो बाप रहेगा" मजकूर टाकल्याने बीडच्या आष्टी शहरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या विरोधात आष्टी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com