North Indian Voters BJP Warning : अटल, मोदी, योगींच्या स्टाईलची तुलना, उत्तर भारतीयांना डावलू नका, नाहीतर..; भाजपला महिला पदाधिकार्‍याचा घरचा आहेर

Neha Dubey Warns BJP Over Ignoring North Indians in Vasai Virar Polls: वसई विरार महापालिकेत उत्तर भारतीयांना डावलल्यावरून भाजपच्या प्रदेशाच्या महिला पदाधिकारी नेहा दुबे यांनी संताप व्यक्त केला आहे.
North Indian voters BJP backlash
North Indian voters BJP backlashSarkarnama
Published on
Updated on

Vasai Virar Mahanagarpalika Election : महापालिका निवडणुकीत भाजपने उत्तर भारतीयांना डावलू नये, असा इशारा देताना, अटलबिहारी वाजपेयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दाखल देत महिला पदाधिकाऱ्याने भाजपला घरचा आहेर दिला आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक दिवस राहिला असतानाच, भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष लिगल सेल विभागाच्या महिला पदाधिकारी नेहा दुबे यांनी, उत्तर भारतीय पदाधिकाऱ्यांची खदखदीला वाट मोकळी करून दिली.

पालघर जिल्ह्यातील वसई-विरार महापालिका निवडणुकीत (Municipal Election) भाजपमधील उत्तर भारतीय पदाधिकाऱ्यांना डावलले जात असल्याने नाराजी पसरली आहे. बाहेरून, इतर पक्षातून आलेल्या भाजपकडून संधी दिली जात आहे. यामुळे भाजपमध्ये वसई-विरार महापालिका क्षेत्रात उत्तर भारतीय पदाधिकाऱ्यांचा वेगळी भूमिका घेण्याची तयारी केली आहे.

उत्तर भारतीय उमेदवारांना डावलून उमेदवारी दिली जात आहे. वसई विरार शहरात 80% टक्के मतदार हे उत्तर भारतीय आहेत. यामुळे उत्तर भारतीयांना डावलून चालणार नाही, असा थेट इशारा नेहा दुबे यांनी आमदार राजन नाईक यांना दिला आहे. नेहा दुबे यांनी अधिक आक्रमक भूमिका मांडत भाजपला (BJP) थेट इशारा दिला आहे.

North Indian voters BJP backlash
Ahilyanagar Municipal Election : पहाटे 4 वाजेपर्यंत बैठक, तोडगा नाहीच; शिंदेंची शिवसेना अहिल्यानगरमध्ये वेगळ्याच मूडमध्ये!

नेहा दुबे म्हणाल्या, "वसई विरार महापालिकेमध्ये 80% हे उत्तर भारतीय मतदार आहेत. भाजप इथं उत्तर भारतीय लोकांच्या मतदारांवरच निवडून येतो. उत्तर भारतीय मतदार ठरवतात, कोणता पक्ष जिंकणार. विधानसभा निवडणुकीत देखील वसई विरारमधून उत्तर भारतीय मतदारांनीच भाजपचा विजय निश्चित करून दिला. यामुळे वसई विरार महापालिकेमध्ये उत्तर भारतीयांना डावलून चालणार नाही."

North Indian voters BJP backlash
RPI BJP Alliance : 'RPI'चं ठरलं, कमळावर लढणार, पण सन्मान..; रामदास आठवलेंनी महायुतीला ठणकावलं

"राहिला प्रश्न भाजपचा, तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये, आपल्या घरावर कोणी कचरा फेकला, तर तो आपणच साफ करत होतो. पण आता देशात नरेंद्र मोदी यांचं राज्य आहे, यांच्या काळामध्ये ज्यांनी कचरा फेकला आहे, त्यांच्याकडून साफ करून घेतला जातो. परंतु उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं म्हणणं आहे की, कचरा फेकणाऱ्याकडून कचरा साफ करून घ्यायचाच, परंतु कचरा फेकणाऱ्याला देखील साफ करायचं. यामुळे उत्तर भारतीय असा समाज आहे की, तो तुमचा विजय पण निश्चित करेल आणि पराभव पण निश्चित करेल. त्यामुळे इथं उत्तर भारतीयांना डावलून चालणार नाही," असा इशारा नेहा दुबे यांनी दिला.

'वसई विरार महापालिकेमध्ये भाजपने इतर पक्षातून इनकमिंग सुरू करून घेतलं आहे, त्यांना तिकीट दिले जात आहेत. यातून भाजपमधील निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्यांना विशेष करून उत्तर भारतीयांना डावलले जात आहे, हे चालणार नाही. वसई विरार महापालिकेचे जे कोणी निरीक्षक असतील, त्यांनी इथं लक्ष द्यावं. तसंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील या प्रकाराची दखल घ्यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधताना, वसई विरार मध्ये उत्तर भारतीयांना डावलून चालणार नाही, हे लक्षात घ्यावं,' असेही नेहा दुबे यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com