RPI BJP Alliance : 'RPI'चं ठरलं, कमळावर लढणार, पण सन्मान..; रामदास आठवलेंनी महायुतीला ठणकावलं

Mumbai BMC Election: RPI Demands 16 Seats from BJP Mahayuti, Says Ramdas Athawale : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप महायुतीत रिपब्लिकन पक्षाला अपेक्षित असलेल्या जागांचा प्रस्ताव पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी जाहीर केला.
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai local body elections : मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीकडून रिपब्लिकन पक्षाला किमान 16 जागा सोडाव्यात, अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

वांद्रे इथल्या पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर भूमिका मांडली.

रामदास आठवले म्हणाले, 'महायुतीमध्ये जागावाटपाच्या चर्चेसाठी रिपब्लिकन पक्षाला सन्मानाने बोलावण्यात आले नाही, याबद्दल आमच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमोर मांडणार आहोत.' अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसाआधी आम्हाला सन्मानजनक जागा मिळतील, असा विश्वास आहे.

मुंबई आरपीआयचा महापौर झाला होता

रिपब्लिकन पक्षाने (RPI) 26 वॉर्डांची यादी महायुतीला दिली असून, त्या 16 पैकी किमान 16 जागा मिळाव्यात, अशी मागणी पक्षाने केली आहे. 1992मध्ये काँग्रेससोबत असताना रिपब्लिकन पक्षाचे 12 नगरसेवक निवडून आले होते आणि तेव्हा मुंबईचा महापौरही रिपब्लिकन पक्षाचा झाला होता.

Ramdas Athawale
MNS Raju Patil Vs Nileshchandra warning : जैन मुनी नीलेशचंद्र यांची खोडी पकडली? ती राजकीय सुपारीच? राज ठाकरेंच्या शिलेदारानं दिला मोठा सल्ला!

पुण्यात कमळावर लढली होती RPI

आमचा पक्ष कोणासोबत जातो त्यांचा विजय होतो, हा इतिहास आहे. या वेळेसही महायुतीसोबत राहून विजय मिळवू. 2017मध्ये पुणे महापालिकेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने भाजपच्या कमळ चिन्हावर 13 जागांवर लढत दिली होती. त्यापैकी पाच जागा जिंकल्या आणि पक्षाचा उपमहापौर झाला होता. त्यामुळे मुंबईतही रिपब्लिकन पक्ष कमळ चिन्हावर उमेदवार उभे करायला तयार आहे.

Ramdas Athawale
Narendra Modi foreign visits 2025 : फ्रान्स ते ओमान; नरेंद्र मोदींचे 2025मध्ये गाजलेले 23 परदेश दौरे...

दरेकरांनी आठवलेंना दिला शब्द

रामदास आठवले यांच्या पत्रकार परिषदे दरम्यान भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी आठवले यांची भेट घेऊन रिपब्लिकन पक्षाचा सन्मान राखला जाईल, असे आश्वासन दिले. दरेकरांनी म्हटले, 'रामदास आठवले हे महाराष्ट्रातील नव्हे, तर संपूर्ण देशातील आंबेडकरी चळवळीचे प्रमुख नेते आहेत. त्यांना सन्मानजनक जागा दिल्या जातील.' या वेळी रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई सरचिटणीस विवेक पवार, काकासाहेब खंबाळकर, पप्पू कागदे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com