Eknath Shinde News : नगरपालिका निवडणुकीत दगाफटका, एकनाथ शिंदेंनी बालेकिल्ल्यात लावली मजबूत फिल्डींग; कुणाचा करेक्ट कार्यक्रम?   

Municipal elections Maharashtra : मिरा-भाईंदर महापालिकेची जबाबदारी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे देण्यात आली आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Thane district politics : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. ठाण्यात पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा प्रमुख नेत्यांची एक विशेष बैठक घेतली. या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुकांसाठी रणनीती ठरवण्यात आली असून, दिग्गज नेत्यांवर विशिष्ट शहरांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

ठाणे जिल्हा व परिसरातील सर्व प्रमुख महापालिकांबाबत मंगळवारी (ता. १६) रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत ठाण्यातील मेळाव्यानंतर झालेल्या या बैठकीला प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, रवींद्र फाटक, गोपाळ लांडगे, हेमंत पवार, विजय चौघुले यांच्यासह शिंदेसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व राखण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे. ठाणे महापालिकेची जबाबदारी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांसाठी खासदार श्रीकांत शिंदे आणि गोपाळ लांडगे हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.

Eknath Shinde
Nitin Gadkari policy : तुमची बदनामी होतेय..! संसदेत दिग्विजय सिंह यांचं ऐकून घेत समोर बसलेल्या गडकरींनी दिले मोठ्या निर्णयाचे संकेत

मिरा-भाईंदर महापालिकेची जबाबदारी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे देण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेसाठीदेखील खासदार नरेश म्हस्के हे शिंदेसेनेच्या वतीने नेतृत्व करणार आहेत. तर वसई-विरार महापालिकेसाठी रवींद्र फाटक हे भाजपसोबत चर्चा व समन्वय साधणार आहेत.

Eknath Shinde
Atal Bihari Vajpayee : वाजपेयींनी ‘तो’ प्रस्ताव फेटाळला, अन्यथा अडवाणी झाले असते पंतप्रधान; भाजपमधील धक्कादायक माहिती समोर

वरिष्ठ नेत्यांचे ‘सुपरव्हिजन’

महायुतीमध्ये जागावाटपावरून किंवा स्थानिक पातळीवर काही पेच निर्माण झाल्यास, तो सोडवण्यासाठी त्रिसूत्री निश्चित करण्यात आली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे या प्रक्रियेवर लक्ष ठेवून अंतिम तोडगा काढतील, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com