Narayan Rane News : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत नारायण राणेंनी दिली 'ही' मोठी अपडेट

BJP Political News : भाजप खासदार नारायण राणे यांनी गुरुवारी (ता.9) रत्नागिरीत मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी महापालिका निवडणुकांविषयी मोठं विधान करत महायुतीत खळबळ उडवून दिली आहे.
Narayan Rane, Mumbai High Court
Narayan Rane, Mumbai High CourtSarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : महायुतीनं पुन्हा एकदा महाराष्ट्राची सत्ता काबीज करताना ऐतिहासिक बहुमत मिळवलं. 288 पैकी तब्बल 230 जागा जिंकल्या.आता हे सरकार सत्तेत परतल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका लवकर जाहीर होण्याच्या शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच आता या निवडणुकांसाठी भाजपकडून स्वबळासाठी चाचपणी सुरू असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी मोठं विधान केलं आहे.

भाजप (BJP) खासदार नारायण राणे यांनी गुरुवारी (ता.9) रत्नागिरीत मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी महापालिका निवडणुकांविषयी मोठं विधान करत महायुतीत खळबळ उडवून दिली आहे. राणे यांनी भविष्यात भाजप म्हणून आम्ही निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं सांगितलं आहे.

खासदार नारायण राणे म्हणाले,भाजप म्हणून आम्ही भविष्यात निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. कोणती निवडणूक स्वबळावर लढणार हे सांगू शकत नाही. पण मुंबईत भाजपची प्रचंड ताकद आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार आहे,असं विधान केलं आहे.

Narayan Rane, Mumbai High Court
Fadnavis-Thackeray and Eknath Shinde: ठाकरे अन् CM फडणवीसांची वाढती जवळीक; शिंदे - राज ठाकरेंसाठी धोक्याची घंटा..?

त्याचवेळी त्यांनी राजन साळवींच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवरही भाष्य केलं.त्यांच्याबाबत पक्ष विचार करेल,असं राणे म्हणाले. मुंबईत भाजपची प्रचंड ताकद आहे.यावेळी त्यांनी नितेश राणे कोणतंही खातं सांभाळण्यासाठी सक्षम आहे. आरएसएसचं पवारांनी कौतुक केलं, त्यात वावगं काहीच नाही.भाजपाचे चांगले दिवस सुरु आहेच,त्याचं तुम्ही स्वागत केलं पाहिजे.लोकांना विकास दिसत आहे.त्यामुळे पक्षप्रवेश होत असल्याचंही नारायण राणे यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com