Konkan News : पोलिसांनी चार दिवस मुक्काम ठोकला; पण राष्ट्रवादीच्या नगरसेवकपुत्राला अटकच केली

फैजान रखांगे यांच्या बँक खात्यात दीपक सावंत यांनी जवळपास दीड कोटींपेक्षा अधिक रक्कम वर्ग केल्याची कागदोपत्री माहिती पोलिसांना मिळाली होती.
NCP
NCP Sarkarnama
Published on
Updated on

दाभोळ (जि. रत्नागिरी) : दापोली येथील व्यावसायिक फैजान रखांगे याला रत्नागिरी जिल्हा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून काल (ता. ९) रात्री ८ वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. दापोली नगरपंचायतीचे राष्ट्रवादीचे (NCP) नगरसेवक अन्वर रखांगे यांचा हा मुलगा आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने नगरसेवक पुत्राला अटक केल्याने दापोली नगरपंचायतीतील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे. (NCP corporator's son arrested in Dapoli embezzlement case)

दापोली नगरपंचायतीचे तत्कालीन लेखापाल दीपक सावंत यांनी नगरपंचायतीमध्ये कोट्यवधींचा आर्थिक अपहार केल्याची तक्रार दापोली नगरपंचायतीचे लेखापाल सिद्धेश खामकर यांनी दापोली पोलिस ठाण्यात दाखल केल्यावर दीपक सावंत सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांनी सावंत खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयात हजर झाले त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते जामिनावर मुक्त आहेत.

NCP
Karnataka Assembly Election : ‘बंडखोरी करू नका; महामंडळाचे अध्यक्षपद देऊ...’ : संभाव्य बंडखोरांना काँग्रेसची ऑफर

या प्रकरणाचा तपास जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला आहे. फैजान रखांगे यांच्या बँक खात्यात दीपक सावंत यांनी जवळपास दीड कोटींपेक्षा अधिक रक्कम वर्ग केल्याची कागदोपत्री माहिती पोलिसांना मिळाली होती. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी गेले चार दिवस फैजान रखांगे यांना ताब्यात घेण्यासाठी दापोलीत तळ ठोकून होते. फैजान रखांगे गेले काही दिवस देशाबाहेर गेल्याची चर्चा होती; मात्र ते दापोलीत येताच या पथकाकडून त्यांना दापोली येथून अटक करण्यात आली आहे.

NCP
Sangola News : सत्कारासाठी आयोजकांनी साळुंखेंचे नाव पुकारले; मात्र दीपकआबांनी प्रशांत परिचारकांसाठी आग्रह धरला...

दापोली नगरपंचायतीमधील अपहाराचे प्रकरण सत्ताधारी असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उघड केले होते; मात्र या प्रकरणात आता राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या मुलालाच अटक झाल्याने दापोलीत खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com