आपल्याला बलाढ्य प्रतिस्पर्ध्याशी लढायचे आहे, हे विसरू नये : राष्ट्रवादीचा मित्रपक्षांना सल्ला

कोणाचे किती बळ हे चार राज्यांतील निवडणुकीत दिसले आहे : राष्ट्रवादीचा काँग्रेसला टोला
ncp-congress
ncp-congresssarkarnama

सावंतवाडी : नुकत्याच झालेल्या चार राज्यांतील निवडणुकीत कोणाचे बळ किती आहे, हे सर्वांनी बघितले आहे. मात्र, आमच्याच मित्रपक्षांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. त्याचे आपण स्वागत करतो. अशीच भूमिका मित्रपक्षांनी (कॉंग्रेस, Congress) घेतल्यास आम्हीसुद्धा स्वबळावर लढण्याचा विचार करू, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज येथे घेतली. (NCP is ready to fight on its own in the upcoming elections)

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या येथील संपर्क कार्यालयात आज (ता. १९ मार्च) ई-श्रम कार्ड वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सामंत म्हणाले, ‘‘प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचा विस्तार करणे, निवडणुका स्वबळावर लढविणे, लोकांसमोर स्वबळावर जाणे याचे स्वातंत्र्य असते. मात्र, नुकत्याच झालेल्या चार राज्यांत कोणाचे बळ किती आणि कसे, हे सर्व लोकांनी पाहिले आहे. आपल्याला एका बलाढ्य प्रतिस्पर्ध्याशी लढायचे आहे, हे कोणी विसरू नये. मित्रपक्षांनी स्वबळाचा विचार केल्यास आम्हीसुद्धा पक्ष म्हणून तयारी करत आहोत. मात्र, यात तिसऱ्या शक्तीचा फायदा व्हावा आणि नको ती वाईट प्रवृत्ती सत्तास्थानी बसावी, याचे उदाहरण गेल्या सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्यावेळी बघितले आहे. याची पुनरावृत्ती होऊ नये, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. मात्र, मित्रपक्षांनी वेगळी भूमिका घेतल्यास राष्ट्रवादी पक्षसुद्धा त्या गोष्टीचा विचार करेल. स्वबळावर लढायचे की युती करून लढायचे, याचा संपूर्ण निर्णय राज्यातील नेते घेतील. स्वबळ हा आमचा शेवटचा पर्याय असेल.’’

ncp-congress
शिवसेनेचे राजेश क्षीरसागर ‘नॉट रिचेबल’ : सतेज पाटील म्हणतात ‘आमचं ठरलंय...’

दरम्यान, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांचा माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या हस्ते सत्कार झाला. या वेळी माजी राज्यमंत्री भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सामंत, सावंतवाडी विधनासभा अध्यक्ष घारे-परब, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, हिदायतुल्ला खान, अफरोज राजगुरू, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, पूजा दळवी, सत्यजित धारणकर, इफ्तेकार राजगुरू, कौस्तुभ नाईक, हर्षद बेग, फैयाज शेख आदी उपस्थित होते.

ncp-congress
कोल्हापूरच्या राजकारणात ट्विस्ट : शिवसेनेचे राजेश क्षीरसागर ‘नॉट रिचेबल’!

घारे-परब यांची संकल्पना

राष्ट्रवादीच्या येथील विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या संकल्पनेतून शहरात ई-श्रम कार्ड नोंदणी आणि मोफत युनिवर्सल पासची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. १९ ते २७ मार्चपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत श्रद्धा सदन, उभाबाजार, सावंतवाडी येथे ही सुविधा असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com